Maharashtra Weather : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये १७ ऑगस्टला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राकडून पुढील चार दिवसांचे अंदाज जारी करण्यात आले आहे. १६ ते २१ ऑगस्टदरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आहे. अंदाजानुसार, कोकणासह घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातही जोरदार पाऊस बसरणार असल्याचा अंदाज आहे.
मुंबईसह पुण्यात उद्या १७ ऑगस्टला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टी भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार दिवस किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तर विदर्भातही काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट असणार आहे. तर सोमवारी १८ ऑगस्टला रत्नागिरीसह पश्चिम महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान उत्तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांतही पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे. १८ आणि १९ ऑगस्टला या भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर २० ऑगस्टला केवळ किनारपट्टीभागासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी भागात ताशी 50 ते 60 किमी एवढा वाऱ्याचा वेग राहणार आहे.
दरम्यान, मुंबई उपनगरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या महिन्याभरापासून लपंडाव करणाऱ्या पावसाने शनिवारी रात्रीपासून दमदार हजेरी लावली. उपनगरांतील कुर्ला , घाटकोपर , सायन , मुलुंड , ठाणे इथे मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

