Sharad Pawar Speech : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पुण्यातील भाषणात केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली. सध्याच्या परिस्थिती ही चिंताजनक असल्याचं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले. यासाठी त्यांनी इतिहासातील राजकीय घडामोडींचा दाखला दिला.
“चित्र बदललं आहे म्हणून आम्ही सगळे दिल्लीमध्ये एकत्र बसलो. या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी आणि इतर पक्षांचे नेते असतील. आम्ही एका दिवशी ठरवलं. रोज सभागृह बंद पाडणे हे काय बरोबर नाही. आम्ही ठरवलं असं कामकाज चालणार नाही आणि 300 खासदार एकत्र बाहेर आले, आणि आंदोलन केलं. पार्लमेंटच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं. पण लोकशाही टिकवण्यासाठी हे आम्ही हे 15 दिवसांपूर्वी केलं”, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
शरद पवारांकडून जुन्या आठवणींना उजाळा
यावेळी शरद पवारांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींनादेखील उजाळा दिला. “सॅटर्डे क्लबला 22 वर्ष झाले. मी आज पहिल्यांदा आलो आहे. माझ्या कॉलेजेच्या मित्रांकडे गेलो की ते विचारायचे जेवण झालं का? मी नाही म्हणालो की ते म्हणायचे जेवून या. विलास (विलासराव देशमुख) काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये काम करणारा सहकारी आम्हाला लाभला. युवकांच्या चळवळी उभ्या केल्या, महाराष्ट्राचं नेतृव त्याने केलं. यशवंतराव चव्हाण असो. वसंत दादा पाटील असो, त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस वाढवली. देशातल्या काँग्रेसला दिशा दिली. या महाराष्ट्राला उत्तम प्रशासन दिलं, अशा लोकांची संपर्क साधण्याची संधी ऊर्जा स्थानी मिळाली हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा ठेवा आहे”, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार आणखी काय-काय म्हणाले?
“विलासराव देशमुख यांनी गांधी, नेहरूंचा विचाहर हा देशाला एकत्र ठेऊ शकेल हे सूत्र स्वीकारलं आणि ते अखंडपणाने चालू ठेवलं. महाराष्ट्राच्या पातळीवर त्यांना काम करता आलं. महाराष्ट्र विधान परिषद असो, महाराष्ट्रच्या युवकांचं काम असो, महाराष्ट्र काँग्रेसचं काम असो, यामध्ये सत्यात ठेऊन या सगळ्याची बांधीलकी ठेवण्याची भूमिका उभ्या भविष्य मध्ये विलासने ठेवली आणि म्हणून गांधी नेहरू यांच्या विचाराचा निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांच्याकडे बघितले जात.”
“मी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळा पासून त्यांना बघितलं आहे. विलासराव यांची आणखी एक गोष्ट आहे. राजकीय भूमिका असेल किंवा राजकारणाच्या बाहेरचे क्षेत्र असेल, त्यामध्ये सुद्धा वारकऱ्यांची असेल किंवा साहित्यिकांची असेल, अनेक वेळा आमच्या बैठका झाल्या. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आम्ही एकत्र फिरलो. त्यांच्याकडे युवकाचा नेतृत्व होतं. त्यावेळेस नुकताच मी राज्य सरकारमध्ये गेलो होतो. त्यावेळेस महाराष्ट्रातली तरुणांची फौज माझ्या आजूबाजूला होती आणि त्यामागे मोठा वाटा हा विलासरावांचा होता.”

