Maharashtra Politics : ‘शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात सुनावणीची तारीख अखेर फायनल, तुम्हाला काय वाटतं? पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळेल?’ असा प्रश्न महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने यूट्यूबवर पोल घेत विचारला होता
एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं असलं तरी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेवरील दावा सोडलेला नाही. ही लढाई सुप्रीम कोर्टात लढाई सुरुच आहे. अशावेळी समर्थकांमध्येही दोन गट पडलेले आहेत.
शिंदे vs ठाकरे
कुणी म्हणतं की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे राजकीय वारसदार आहेत. कारण बाळासाहेबांनीच त्यांच्याकडे सूत्रं सोपवली, उद्धव ठाकरेंकडे शिवसेना पक्षप्रमुख पदही होतं. “बंड करणारे एकनाथ शिंदे गद्दार आहेत” असं ठाकरे समर्थक मानतात.
Padmakar Valvi : शिंदेंना भिडलेले, भाजपला नडलेले; ‘कमळ’ सोडून माजी मंत्री ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत
दुसरीकडे, बाळासाहेबांच्या विचारांचे वारस एकनाथ शिंदे असल्याचं सांगत अनेक आमदार-खासदार-नगरसेवकांनी त्यांच्या गटात प्रवेश केला. शिंदे हेच बाळासाहेबांच्या विचारधारेवर चालतात, असा शिंदे समर्थकांचा दावा आहे.
Rajiv Goliwar : ‘साहेबां’च्या बर्थडेला आला का नाहीत? भाजपकडून नोटीस, मुनगंटीवारांचा कट्टर समर्थक नाराज, राजीनामा टाकला
मटा ऑनलाईन पोलचे अंदाज काय?
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने यूट्यूबवर पोल घेत नेटिझन्सचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘शिवसेना नक्की कोणाची? सुप्रीम कोर्टात सुनावणीची तारीख फायनल, आपल्याला काय वाटतं? पक्ष व चिन्ह कोणाला मिळेल?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर 20 तासात जवळपास 80 हजार यूट्यूब युजर्सनी आपलं मत नोंदवलं आहे.
Uddhav Thackeray on Folk Aakhyan : फोक आख्यानमधील कलाकारांना स्टेजवर बोलावलं, उद्धव ठाकरेंकडून कौतुक
तब्बल 84 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मतदान केलं आहे. म्हणजेच जवळपास 66 हजार जणांनी ठाकरेंना मत दिलं आहे. दुसरीकडे 14 टक्के मतदारांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष नाव-चिन्हं मिळावं, असं म्हटलं आहे. साधारण 11 हजार जणांच्या मते शिवसेना शिंदेंकडे जावी. तर दोन टक्के म्हणजेच 2-3 हजार नेटिझन्स तटस्थ आहेत.

