Raigad Crime News : रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांत मोठी वाढ झाली आहे, जे अत्यंत गंभीर आहे. यातच आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका पाच वर्षाच्या मुलावर एका पंधरा वर्षाच्या मुलाने अत्याचार केला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
राज्यात गेले काही दिवस महिलांवरील अत्याचार अल्पवयीन मुलामुलींवर अत्याचार अशा प्रकारच्या घटना समोर येत असताना. रायगड जिल्ह्यातही अशीच एक मोठी घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलांने एका अल्पवयीन मुलाचा छळ केला.
Palghar Crime : अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवयात ढकललं, अनेकांकडून वारंवार अत्याचार; पोलिसांकडून 9 नराधम गजाआड
पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने पाच वर्षीय मुलास एका झाडी ठिकाणी घेऊन गेला तेथे त्याने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. यामुळे मुलाच्या गुप्तांगाला इजा झाली आहे. मुलाला उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संतापजनक घटनेमुळे सारेच हादरले आहेत. याच प्रकरणाची गंभीर दखल रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील एका शासकीय वसतिगृहातील खोलीत राहत असलेल्या अंदाजे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलांनी पाच वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे येत आहे. आरोप असलेल्या या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलांविरुद्ध रायगड जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रकिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
सदर मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आणले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तसेच रायगड पोलिस सूत्रांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग अथवा मुलींवर अतिप्रसंग करून त्यांची हत्या करण्याच्या घटेनेत दिवसेंदिवस घडत असल्याने अशा प्रकारच्या धक्कादायक आणि लाजिरवाण्या रायगड जिल्ह्यात अलीकडे घडल्या आहेत.अल्पवयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर होणारे अत्याचार ही चिंतेची बाब बनली आहे.

