भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कट्टर कार्यकर्ता शरणू हांडेचं गुरुवारी सायंकाळी सोलापूर शहरात अपहरण करण्यात आलं होतं. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत विष्णू हांडे यांनी तक्रार दाखल केली होती. सोलापूर शहर पोलिसांनी अत्यंत नाट्यमय पद्धतीने पाठलाग करून हांडेची सुटका केली होती. पोलिसांना आरोपींकडे धक्कादायक वस्तू सापडल्या आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी अपहरणकर्त्या 4 आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सोलापूर शहर पोलिसांनी MH 12 XX 6547 हे चारचाकी वाहन ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन कोयते आणि इतर लोखंडी साहित्य जप्त केले आहे. त्यासोबत साडी, फटाक्यांची माळ, कंडोम आणि ट्रायपॉड असं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. त्यामुळे, आरोपींकडून जप्त करण्यात आलेलं साहित्य नेमकं कशासाठी होतं? असा प्रश्न अनेकांसह पोलिसांनाही पडला आहे.
5 ते 10 मिनिटे उशिरा झालो असतो तर जीव गेला असता
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 5 ते 10 मिनिटे पोलिसांना उशिरा झाला असता तर पडळकरांच्या त्या शरणू हांडे या कट्टर कार्यकर्त्याचा गेम ओव्हर झालं असता, अशी खात्रीशीर माहिती मिळाली आहे. सुदैवाने पोलीस वेळेवर पोहोचले आणि शरणू हांडे यांचा जीव वाचला. विष्णू हांडे यांनी फिर्याद दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. अमित सुरवसे म्हाळप्पा सुरवसे (वय 29) सुनील भीमाशंकर पुजारी(वय 20 वर्षे), दीपक जयराम मेश्राम(वय 23 वर्षे), अभिषेक गणेश मानें(वय 23 वर्षे) यांना ताब्यात घेतले.
पडळकर यांच्या त्या टीकेवरून सुरु झालं
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी 2021 साली सोलापूर शहरात पत्रकार परिषद घेतली होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवारांवर सडकून टीका केली होती. त्यांनी ‘रात्र गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात’, अशा भाषेत टीका केली होती. राष्ट्रवादी समर्थक अमित सुरवसे याच्या जिव्हारी ही टीका लागली होती. या टीकेवरून अमित आणि शरणू नेत्यांना खुश करण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठले आहेत.
पोलिसांनी चार टीमने पडळकरांच्या कार्यकर्त्यांच जीव वाचविला
एमआयडीसी पोलिसांनी आणि पोलीस आयुक्तांलया अंतर्गत असलेल्या गुन्हे शाखेच्या टीममे अपहरण झालेल्या शरणू हांडेचा जीपीएसच्या आधारे तपास केला. पोलीस आयुक्त एम. राजकुमा, पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त अश्विनी पाटील , सहा. पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर , वपोनि प्रमोद वाघमारे, वपोनि सुनिल दोरगे, पोनि विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखालीएपीआय भरत चंदनशिव, सपोनि शंकर धायगुडे (गुन्हे शाखा), पोउपनि महेंद्र गाढवे, पोहेकॉ सचिन भांगे, पोना मंगेश गायकवाड, पोकॉ शैलेश स्वामी, पोकॉ अमोल यादव, पोकॉ अमसिध्द निंबाळ, पोकॉ सुहास अर्जुन, पोकॉ शंकर याळगी, पोकॉ कुमार बोल्ली, पोकॉ अमर शिवसिंगवाले, पोकॉ किशोर व्हनगुंटी, पोकॉ अविनाश डिगोळे, पोकॉ/ सकलेन मुकादम, तसेच गुन्हे शाखेकडील पोहेकॉ/ अंकुश भोसले, पोहेकॉ शैलेश बुगड, पोकॉ काशिनाथ वाघे, पोकॉ अभिजतीत धायगुडे, पोकॉ राजकुमार वाघमारे यांनी ही कामगिरी बजावली.

