Sangli Wife and Husband Death : सांगलीत अतिशय दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पत्नीच्या निधनानंतर पतीचाही मृत्यू झाला. सुनिता जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, पतीचाही 4 दिवसात मृत्यू झाला.
आळसंद गावात मंगळवारी सुनिता जाधव यांचं रक्षा विसर्जन करण्यात येणार होतं. परंतु हिंदू धर्म रिवाजानुसार मंगळवारी ऐवजी बुधवारी एक दिवस पुढे त्यांचं रक्षा विसर्जन करण्याचं ठरवलं. परंतु त्याच दिवशी 6 ऑगस्ट रोजी पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पती धनाजी जाधव यांना देखील हृदयविकाराचा तीव्र झटका आला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचाही मृत्यू झाला.
Sangli News : चार महिन्यांपूर्वी प्रेम प्रकरण समोर, अचानक कर्नाटकच्या तरुणाची सांगलीत बॉडी; हात बांधलेले, लिंबाच्या झाडाला…
मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर ट्रक आल्याने अपघात, जीवितहानी नाही; पण प्रवासी गाड्या अडकल्या!
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पत्नी पाठोपाठ पतीचा देखील मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण आळसंद गावावर शोककळा पसरली आहे.

