Uddhav Thackeray Raj Thackeray reunite : शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी मटा कट्टा कार्यक्रमात भाष्य केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित ‘मटा कट्टा’ या कार्यक्रमात भाग घेतला. यात त्यांनी पक्ष संघटना बांधणीसाठीचे नियोजन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महायुतीची कामगिरी याविषयी भाष्य केले.
काय म्हणाले रवींद्र चव्हाण?
‘भाजप पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. संघटनेत पदाधिकारी कुणीही असो तीन वर्षांत एकदा बदल होतो. नुकतीच 1200 हून अधिक मंडल अधिकारी, 80 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश कार्यकारिणीची नियुक्ती होणे बाकी असून संघटनात्मक प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल’, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
Uddhav Thackeray : मनसेसोबत युतीच्या चर्चा; उद्धव ठाकरेंचा तीन दिवसांचा दिल्ली दौरा, कोणाच्या भेटीगाठी?
‘पक्ष संघटनेमध्ये परिस्थितीनुरूप बदल करावे लागतात. राज्यात भाजप बराच काळ विरोधी पक्षात होता. पण गेल्या काही वर्षांपासून केंद्रात आणि आता राज्यातही भाजप सत्तेत आहे. गावाखेड्यापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारचे विधायक निर्णय पोहोचविणे गरजेचे झाले आहे. सध्या पक्ष संघटना यात कमी पडत असल्याचे माझे निरीक्षण असून त्यासाठी एक सुनियोजित व्यवस्था तयार करण्याचे माझे प्रयत्न आहेत. महायुतीचे विधायक निर्णय बारा बलुतेदार आणि बूथ पातळीपर्यंत पोहोचवल्यास एकूणच पक्षाला त्याचा फायदा होईल’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra Politics : भाजपचा शिवसेना-राष्ट्रवादीला ठेंगा, पुण्यात 110 जागांवर जाळं विणलं, दादा-भाईंची थेट नाराजी, काय घडतंय?
शायरीतून काँग्रेसवरील नाराजी उघड, कैलास गोरंट्याल यांनी भाजप प्रवेशाचं कारण सांगितलं
‘जनतेला विकास हवा’
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाष्य केले. ‘जनतेला विकास हवा आहे. तो केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. राज्यातील विकासकामे, पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था, रोजगार, परदेशी थेट गुंतवणूक यावर जनता मत देते. भावनात्मक मुद्द्यांवर कुणाला निवडणूक लढवायची इच्छा असेल ती त्यांची इच्छा आहे’, असेही चव्हाण म्हणाले.

