Nagpur Home Guard Ends Life: नागपुरात एका होमगार्डने उड्डाणपुलावरुन उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. त्याने हे टोकांंचं पाऊल का उचललं याबाबत सध्या काहीही माहिती नाही. या घटनेने नागपुरात एकच खळबळ माजली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, यशवंत शाहू यांनी आपली दुचाकी उड्डाणपुलावर उभी केली आणि काही वेळ तिथेच उभा राहिले. त्यानंतर अचानक त्यानी अचानक उड्डाणपुलावरून उडी घेतली. पुलावरून खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना व रुग्णवाहिकेला माहिती दिली. लगेचच त्याला गंभीर अवस्थेत मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
मृतक यशवंत शाहू हे जरीपटका परिसरातील कुकरेजा नगरमध्ये राहत होता. तो नागपूर होमगार्ड विभागात कार्यरत होता तसेच मेस्को या खासगी संस्थेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणूनही काम करत होते. त्यांची कोणतीही आत्महत्येपूर्व चिठ्ठी मिळालेली नाही. त्यामुळे त्यानी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.
Crime Diary: जळालेलं शरीर, केस गायब, किडे अन्…; प्रियकरासाठी पतीला क्रूरपणे संपवलं, थरकाप उडवणारी घटना
घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी उड्डाणपुलासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून यशवंत शाहू यांच्या हालचालींबाबत अधिक माहिती मिळू शकेल.
सार्वजनिक ठिकाणी घडलेली ही घटना अत्यंत दुःखद असून, यामुळे नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या अशा प्रकारे जीव दिल्याने मानसिक आरोग्याविषयीही गंभीर चर्चा सुरु झाली आहे. पोलिसांकडून मृतकाच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत असून, त्याच्या वैयक्तिक व आर्थिक अडचणींसंबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मानसिक तणाव, सामाजिक दबाव आणि आर्थिक अडचणी यामुळे अनेकजण आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत, जे अत्यंत चिंताजनक आहे. प्रशासनाने याबाबत योग्य उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

