Pune Businessman Bungalow Robbery Case : 19 जुलै रोजी संध्याकाळी पुण्यातील निगडी प्राधिकरणात राहणारे 76 वर्षीय उद्योजक चंद्रभान अगरवाल यांच्या बंगल्यात घुसून पाच दरोडेखोरांनी लूटमार केली होती
सुरेश लादुराम ढाका, वय 29, रा. दंतीवास, जि. जलौर, राजस्थान, आणि महिपाल रामलाल विष्णोई, वय 19, सध्या रा. वडगाव मावळ, अशी अटक आरोपींची नावे आहेत.
निगडी प्राधिकरणात 19 जुलै रोजी सायंकाळी चंद्रभान अगरवाल, वय 76, या वृद्ध उद्योजकाच्या बंगल्यात घुसून पाच दरोडेखोरांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हातपाय बांधले आणि घरातील कपाटामधील सोन्या-चांदीचे दागिने, महागडी घड्याळे असा तब्बल सहा लाख 15 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता.
जाताना या दरोडेखोरांनी बंगल्यालगतच्या खोलीत राहणाऱ्या रखवालदारासह त्याची पत्नी व दोन मुलांनाही हातपाय बांधून खोलीत कोंडले. त्यानंतर ते पसार झाले. या दरोड्याने शहरात खळबळ उडाली होती.
Mumbai Crime : 16 वर्षीय विद्यार्थ्याला ‘ती’ गोळी देऊन मुंबईतील हॉटेलात अत्याचार, चाळिशीतील शिक्षिकेची डॉक्टर मैत्रीण अटकेत
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने सुमारे 1200 किलोमीटर प्रवास केला; तसेच 200 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासात राजस्थान येथील जयपूरमधून सुरेश ढाका याला अटक करण्यात आली.
बाळा बांगरला पोरींचा नाद’, पत्नी आणि कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, चार वॉकी टॉकी, दोन मोबाइल, सोन्याचे दागिने, फिर्यादीचे पाकीट, आधार कार्ड, गाडीचे आरसी बुक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर, महिपाल विष्णोई याला तळेगाव येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून फिर्यादीच्या पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या, कानातले, घड्याळ आणि बनावट नंबरप्लेट जप्त करण्यात आली.
Pune Crime : मी एकुलता एक, आईच्या मणक्याच्या ऑपरेशनसाठी बेल द्या, विशाल अगरवालचा अर्ज, कोर्ट म्हणालं, तात्पुरत्या जामिनावर…
राजस्थान आणि गुजरात राज्यांत या आरोपींवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आदी 21 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीत एक महिला आरोपी आणि इतर तीन आरोपींचा सहभाग असून, लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

