Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. झोळीत ठेवलेल्या बाळाची चोरी करून त्यांच्याकडून भीक मागायला लावायचे. नेमकी घटना कशी समोर आली जाणून घ्या.
ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. तक्रारदारांच्या पत्नीने तिच्या दोन वर्षांच्या मुलीला झोळीत झोपवले होते. मध्यरात्री अचानक दुसरी मुलगी रडल्याने त्यांना जाग आली. त्या वेळी झोळीत झोपलेली मुलगी गायब असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तपास करून तुळजापूर येथून तीन आरोपींना अटक केली, तर खडकीतील रेंज हिल येथून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
Pune News : पुण्यात हवेची गुणवत्ता ‘वाईट’, खराब हवेच्या दिवसांत वाढ; अतिसूक्ष्म धूलिकणांचे वाढते प्रमाण धोकादायक
तीन आरोपी सराईत गुन्हेगार आरोपी शंकर उजन्या पवार पुणे रेल्वे स्थानकात भीक मागून उदरनिर्वाह करतो. त्याच्यासह आरोपी सुनील भोसले व गणेश पवार यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत, असे तपास अधिकारी सहायक निरीक्षक स्वप्नील पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
VIDEO: पुण्यात सराईत गुंडाचा माज, मुलाच्या मित्रांना बेदम चोपलं; राजकीय कनेक्शनही आलं समोर
आरोपींकडे आणखी पीडित बालके ?
या पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असून, त्यांच्याकडे अथवा त्यांच्या टोळीकडे अधिक पीडित बालके असण्याची दाट शक्यता आहे. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, त्यांनी कट रचला आहे का, याबाबत तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील अमर ननावरे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

