Trimbakeshwar Temple : नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी बनावट ऑनलाईन पास टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट नावं आणि ओळखपत्रं वापरुन त्यांनी तब्बल ५ हजारहून अधिक भाविकांची मोठी फसवणूक केली आहे. या कारवाईमुळे भाविकांची आर्थिक फसवणूक उघडकीस आली असून, मंदिर प्रशासनाने ऑनलाईन प्रणालीतील त्रुटी सुधारण्याचं आश्वासन दिलं आहे.
मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी दोन रांगा ठेवलेल्या आहेत. एक मोफत, तर दुसरी देणगी (प्रति पास २०० रुपये). ऑनलाईन आणि काऊंटरवर उपलब्ध असलेल्या या देणगी पासचा गैरवापर होत असल्याचं माध्यमांतून उघड झालं होतं. या गंभीर प्रकरणाची दखल नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व मंदिराचे अध्यक्ष सचिन भन्साळी यांनी घेतली. त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले.
Ladki Bhahin Yojana : १४ हजारहून अधिक पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, पुरुषांनी पैसे कसे मिळवले? शोध सुरू
गुप्त माहितीच्या आधारे पथकाने पेगलवाडी व त्र्यंबकेश्वर परिसरातून पाच जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्या मोबाईल आणि ईमेल तपासणीत १६४८ बनावट पास काढल्याचा धक्कादायक तपशील समोर आला. यामधून सुमारे ५ हजार भाविकांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पाच आरोपींविरोधात तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेऊन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
Sanjay Raut : …तर फडणवीसांनी मुख्यमंत्री आहेत हे विसरुन जायला हवं; शिंदे पिता-पुत्र, सुमित फॅसिलिटीजवरुन संजय राऊतांची टीका
Girish Mahajan | कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज, रस्त्यांच्या कामाला जोरदार सुरुवात
या कारवाईत ऑनलाईन पास प्रणालीतील त्रुटीही उघडकीस आल्या असून, मंदिर प्रशासनाने त्यात तत्काळ सुधारणा करण्याचं आश्वासन दिलं आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलिसांनी केली आहे.

