Solapur : आईला भेटून परतणाऱ्या तरुण मुलाचा अपघाती मृत्यू;बार्शी तालुक्यात हळहळ
बार्शी तालुक्यातील जामगावजवळ एका हॉटेलमध्ये आईला भेटून परत जात असताना भरधाव पिकअप आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, १२ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान बार्शी-लातूर रोडवर एका हॉटेलजवळ घडली.सचिन नाना केवटे (रा. राऊत चाळ, बार्शी), असे मयत तरुणाचे नाव आहे. जयराम श्रीराम ननवरे (रा. बोरगाव खुर्द, ता. बार्शी) गुन्हा दाखल झालेल्या पिकअप चालकाचे नाव आहे. याबाबत अक्षय चंद्रकांत चोपडे (वय ३१, हॉटेल मॅनेजर, रा. सुभाषनगर, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे,बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
