Pune Goodluck Cafe Viral Video : पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये एका ग्राहकाला बन मस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. आकाश जलगी नावाच्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ बनवून तक्रार दाखल केली, ज्यामुळे कॅफेच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली असून, एफडीएने या प्रकरणाची नोंद घेतली आहे.
पुण्यातील गुडलक कॅफेतील बन मस्कामध्ये आढळले काचेचे तुकडे, ग्राहक संतापला
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये आकाश जलगी नावाचा व्यक्ती आपल्या पत्नीसोबत आला होता. त्यांनी चहा आणि बन मस्काची ऑर्डर दिली होती, त्यावेळी बन मस्का देण्यात आला. सुरूवातीला ज्या डिशमध्ये त्यांना बन मस्का देण्यात आला होता, त्यामध्ये बर्फासारखं काहीतरी दिसलं. पण त्यांनी व्यवस्थित पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ते बर्फाचे तुकडे नसून त्या काचा आहे. काचांच तुकडे पाहताच आकाश यांचा पारा चढला. पत्नीला चहा नका पिऊ असं सांगत हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यास सुरूवात केली.
Pune News : नऊच्या आत ऑफिसात! पुणे महापालिका आयुक्तांनी छडी उगारली, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेळेत मोठे बदल, लंचब्रेकची वेळही नवीन
कॅफे मालकला सांगितलं असता त्यांनी माफी मागितली आणि बिल घेतले नाही. परंतु आकाश जलगी यांचं म्हणणे आहे की, लक्षात आले म्हणून ठीक पण चुकून ते पोटात गेलं असतं तर मोठा अनर्थ घडला असता या बाबत FDA ला ऑनलाइन तक्रार आकाश जलगी यांनी नोंदवली असून कॅफे मालकाने सांगितले आहे की, ते बन आउट सोर्स करतात आणि संबंधित व्यक्तीच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफे मधल्या बन मस्का मध्ये अढळून आले काचेचे तुकडे FDA ला ऑनलाइन तक्रार आकाश जलगी यांनी नोंदवली असून कॅफे मालकाने सांगितले आहे की ते बन आउट सोर्स करतात आणि संबंधित व्यक्तीच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली आहे#Punenews #Pune #Viralvideo #म pic.twitter.com/NfzGmbdHRB
— Harish Malusare (@harish_malusare) July 11, 2025
Pune Crime : पुण्यात ‘स्पा’च्या आडून देहविक्री बिनबोभाट, धनराज-प्रिया-अनुज त्रिकुटाचे शहरात 100 ठिकाणी काळे धंदे
दरम्यान, पुण्यातील वर्दळीचा असलेल्या एफ सी रोडवरील गुडलक कॅफे हे खूप जुने आहे. गुडलक कॅफेची वेगळी काही ओळख करून द्यावी लागत नाही. गुडलक कॅफेला आवर्जून भेट देतात आणि तिथलं फेमस असलेलं बन मस्काचा आनंद घेतात. मात्र या घटनेमुळे गुडलक कॅफेच्या प्रतिमेला तडा बसलेला आहे. महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइन आरोपाची पुष्ठ करत नाही.

