Baramati Accident News : शिर्सुफळ फाट्याजवळ भीषण अपघात झाला, यात दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला.
त्याच वेळी बारामतीकडून कुरकुंभच्या औद्योगिक वसाहतीत कामासाठी निघालेल्या दुचाकी चालकाला या कारने जोरात धडक दिली. ही धडक एवढी भयानक होती की, यात वाहनचालकाचं शीर धडापासून वेगळं झालं आणि त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. यात चारचाकी कार चालकाचाही जागीच मृत्यू झाला. अपघातात चारचाकी वाहन (MH42 BE 5866) पलटी झालं. अपघाताच्या जागेपासून जवळपास 300 फूट अंतरावर कार फरपटत जाऊन लोखंडी संरक्षित कठड्यावर आदळली.
Vasai News : वसईत पुलाखाली बाळाचा आवाज, रडण्याच्या दिशेने गेले आणि… कचऱ्यात प्लास्टिकच्या गोणीत आढळलं नवजात अर्भक
अपघात इतका भीषण होता, की दुचाकी चारचाकीमध्ये शिरली होती. खराडेवाडीच्या ग्रामस्थ आणि ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी तातडीची मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सोमनाथ होले, पोलीस शिपाई सचिन कोकणे आदींनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले, पंचनामा केल्यावर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
Solapur News | नीरा नदीत नातू वाहून गेल्याची दुर्घटना, आजीनं टाहो फोडला, वारकरीही थबकले
याप्रकरणी धुमाळवाडी, पणदरे (ता. बारामती) येथील हर्षद रामचंद्र कोकरे यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर मृत कार चालक अजित लक्ष्मण लगड (रा. गोपाळवाडी, दौंड) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लगड हा देखील राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत होता, अशी माहिती आहे. सुपा पोलीस ठाण्याचे फौजदार कोळी पुढील तपास करत आहेत.

