• Mon. Sep 7th, 2026

महाराष्ट्र सदन येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 1, 2025
महाराष्ट्र सदन येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन – महासंवाद




नवी दिल्ली, दि. १ : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विन्रम अभिवादन केले.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्र.उपसंचालक मनीषा पिंगळे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी  व्यवस्थापक महाराष्ट्र सदन प्रमोद कोलप्ते यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचा परिचय सर्वांना करुन दिला.

या कार्यक्रमास महाराष्ट्र सदन, महाराष्ट्र परिचय केंद्र येथील अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते.

०००

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed