Youth Drown While Catching Crabs: जर तुम्हीही रात्रीच्या वेळी खेकडे पकड्याला जाणार असाल तर आता सावधान… खेकडे पकडण्यासाठी गेलेला तरुण खदानीमध्ये बुडाला. अग्निशमन विभागाकडून मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू, घटनेने परिसरात एकच खळबळ
किरणला वाचवण्याच्या प्रयत्नात ते अयशस्वी झाले. त्यांनी एकच आरडा ओरड करायला सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक गोळा झाले. परंतु बुडालेल्या किरणचा कुठेही शोध लागत नसल्याने अखेर ही बाब किरणच्या भावाने जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना सांगितली. तेव्हा कुटुंबीय आणि त्यांच्या परिसरातील काही लोकांनी याबाबतची माहिती स्थानिक मानपाडा पोलीस आणि डोंबिवली अग्निशामक दलाला कळवली. मंगळवारी रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास हे लोक खेकडे पकडण्यासाठी गेले होते. तर, पहाटेच्या सुमारास या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली होती.
Dombivli News: अपघातानंतर डोंबिवलीत रिक्षा चालकानं जीव दिला; कार चालकावर घरात डांबून मारहाण केल्याचा आरोप
या घटनेचं गांभीर्य ओळखून डोंबिवली एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी खदानीच्या पाण्यात बुडालेल्या किरणचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे. तब्बल सात तास अग्निशमन दलाचे जवान किरणचा शोध घेत होते. मात्र, त्याचा कोणताही पत्ता लागला नाही.
त्याच्या शोधासाठी अग्निशमन दलाने बोट, गळ आणि कर्मचारी यांच्या सहायाने शोध घेत होते. परंतु पाण्यात बुडालेला किरणचा अद्याप शोध लागला नसून त्याच्या शोधासाठी अग्निशमन दलाचे सहा ते सात जवान गेल्या सात तासापासून अथक परिश्रम घेत असल्याचे डोंबिवली अग्निशमक अधिकारी भाऊसाहेब पगार यांनी सांगितले. अखेर, संध्याकाळपर्यंत त्याचा शोध न लागल्याने शोध मोहीम थांबवण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

