Nandurbar Youth Died: नंदुरबारमध्ये बॅण्डवर नाचत असताना २० वर्षांचा तरुण अचानक जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला. यानंतर रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे.
सध्या सर्वत्र लग्न समारंभाची धूम सुरू आहे. अक्कलकुवा तालुक्यातील शीख फळी येथील युवक गोपाल जया पाडवी (20) हा सोरापाडा येथील लग्नात हळदी समारंभासाठी गेला होता. त्या ठिकाणी हळदीच्या दिवशी बॅण्डच्या गाण्यावर गोपाल नाचत होता. रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास नाचता नाचता गोपाल जमिनीवर कोसळला. त्यावेळी गोपालच्या डोक्यावर मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. तात्काळ त्याला अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. ही दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याची माहिती आहे. या घटनेची शहरासह तालुक्यात चर्चा असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nandurbar News: बाईकसाठी माहेरहून 30 हजार आण; सततचा छळ, दोन लेकरांना घेऊन विहिरीवर गेली अन्.. नंदुरबार हादरलं
अक्कलकुवा शहरालगत असलेल्या सोरा पाडा येथील एका लग्न समारंभात हळदीच्या दिवशी बॅण्डच्या गाण्यांवर नाचत असताना अचानक खाली पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घटना दोन दिवसांपूर्वी घडली. शहरात या घटनेची एकच चर्चा असून हळहळ व्यक्त केली जात आहे .
Nandurbar News: हळदीत बॅण्डवर नाचताना कोसळला अन् काहीच वेळात… वीस वर्षांच्या तरुणाचा हादरवणारा अंत, नंदुरबार हळहळलं
नंदुरबारमध्ये महिलेची दोन मुलांसह विहिरीत उडी, गावात हळहळ
नंदुरबारमध्ये घरच्यांच्या जाचाला कंटाळून एका महिलेने चार आणि दोन वर्षांच्या चिमुकल्या लेकरांसह विहिरीत उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. पती आणि सासू सततचा छळ करत असल्याने या महिलेने हे टाकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. या घटनेने नंदुरबारमध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

