• Sun. Sep 6th, 2026
Live Breaking News In Just One Click : ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स आता फक्त एका क्लिकवर

सिंहगड रोडच्या उड्डाणपुलाचा मुहूर्त ठरला, दोन मंत्र्यांचा वेगळ्या वेळेसाठी आग्रह पण दादा ठाम

पुणे : महापालिकेच्या प्रांगणात एक मे रोजी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी झेंडावंदन करण्याचा शिरस्ता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मरस्त्यावरील उड्डाणपुलाचे उद्घाटन सकाळी सात वाजता होणार आहे. या वेळेत बदल होणार नसल्याने महापालिकेने आपला झेंडा वंदनाचा कार्यक्रम लवकर घेण्याचे नियोजन केले आहे. दररोज दोन लाख वाहनांच्या प्रवासामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा मुहूर्त कोणता असावा, यावरून तीन मंत्र्यांमध्ये जुंपली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी (१ मे) सकाळी सात वाजता हे उद्घाटन होणार आहे. एकीकडे उड्डाणपूल ज्यांच्या मतदारसंघात येतो, त्या दोन मंत्र्यांनी हे उद्घाटन दुपारनंतर घ्यावे, असा आग्रह धरला असला, तरी ‘दादां’च्या भल्या सकाळच्या मुहूर्तामुळे आपल्या उत्साहाला आवर घालण्याची वेळ त्यांच्यावर आल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed