Pune BJP : पुणे भाजपमध्ये मोठे बदल होणार असून, शहराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. तीन नावांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याने शहराध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन शहराध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता असून इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले आहे.
भाजपकडून पर्यवेक्षक धनंजय महाडिक आणि निरीक्षक शेखर इनामदार यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्षपदासाठी योग्य असलेल्या तिघांची नावे विचारण्यात आली होती. या तीनमध्ये एक नाव महिलेचे असणे बंधनकारक होतं. प्रदेश स्तरावरचे पदाधिकारी, शहराध्यक्ष, शहरातील सर्व सरचिटणीस, महिला मोर्चा, युवा मोर्चा यासह अन्य मोर्चाचे शहराध्यक्ष, विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार अशा तब्बल ४० ते ५० पदाधिकाऱ्यांनी नव्या शहराध्यक्षपदासाठी तीन नावं सुचवली आहेत. अहवाल पर्यवेक्षक आणि निरिक्षकांकडून प्रदेशाला सादर केला गेला आहे. आता प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत या नावांवर चर्चा होऊन एका नावावर शिक्कामोर्तब करून शहराध्यक्षाच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.
Bhaskar Jadhav : बस भरलेली, ड्रायव्हर अचानक आजारी… भास्कर जाधवांनी स्टेअरिंग हातात घेत चालवलेली एसटी, काय घडलेलं?
दरम्यान, रविवारी सकाळपासूनच शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्यांनी मतदानाचा अधिकार असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना, फोन तसेच मेसेज करत लॉबिंग केल्याचं चित्र पुणे भाजपात पाहायला मिळालं. आपण आत्तापर्यंत केलेलं कार्य आपल्याला न मिळालेली संधी आणि आपल्याला का संधी द्यावी याबाबतचे मेसेज मतदानाचा अधिकार असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना इच्छुकांकडून पाठवण्यात आले होते.
अटारी-वाघा बॉर्डर बंद, पुरवठा थांबल्याने सुकामेव्याचे दर वाढले; पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम
शहराध्यक्ष पदासाठी एका महिलेचे नाव देणे बंधनकारक होतं त्यामुळे माजी नगरसेविका वर्षा तापकीर आरती कोंढरे , आणि वर्षा डहाळे यांची नावे मोठ्या प्रमाणात चर्चेत होती. तसेच विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, राजेंद्र शेळीकर,गणेश घोष, राजेश पांडे यांची नावं आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे.
Pune News : भाजपचं ठरलं… शहराचा नवा कारभारी कोण? माजी महिला नगरसेविकेचे नाव चर्चेत, इच्छुकांची लॉबिंग
दरम्यान, सुरुवातीला शहराध्यक्ष म्हणून एका आमदाराची निवड होण्याची शक्यता होती त्यामुळे आमदार हेमंत रासने आणि योगेश टिळेकर यांचे देखील नाव सुरुवातीला चर्चेत होतं. मात्र वरिष्ठ पातळीवरून आमदार, खासदारांना शहराध्यक्ष पद नको असा सूर आल्याने ही नाव मागे पडले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता भाजपचा शहराचा कारभारी नक्की कोण असेल याची चूरस वाढली आहे.

