Narhari Zirwal News : लाडकी बहीण योजनेचे हप्ते वेळेवर मिळत नसल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. आता लाडकी बहीण योजनेबद्दल मंत्री नरहरी झिरवळ यांनी मोठे विधान केले. एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांना लवकरच मिळणार असल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले.
मंत्री नरहरी झिरवळ लाडकी बहीण योजनेबद्दल बोलले स्पष्ट
एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही महिलांना मिळाला नाहीये. आता मंत्री नरहरी झिरवळ यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठे विधान केले. नरहरी झिरवळ यांना विचारण्यात आले की, लाडक्या बहिणींना २१०० रूपये हप्ता कधी मिळणार? यावर बोलताना नरहरी झिरवळ म्हणाले की, लाडक्या बहिणींना २१०० रूपये हप्ता देणार असे कोणीही म्हटले नाहीये आणि लाडक्या बहिणी १५०० रूपयांमध्ये आनंदी आहेत.
महाराष्ट्राबाहेर पळून गेलेल्या बंडखोरांना तातडीने मंत्रालयात बोलवा; उच्च न्यायालयात याचिका१५०० रूपयांमध्येही लाडक्या बहिणी खुश आहेत
लाडक्या बहिणी नाराज असल्याचे विरोधकांकडून आणि तुम्ही सांगत आहेत. पण लाडक्या बहिणी खुश आहेत. मुळात म्हणजे लाडक्या बहिणींना २१०० रूपये देणार असल्याचे कोणीही जाहीर केले नाही. काही दिवसांपूर्वीच विरोधकांनी म्हटले होते की, सरकार लाडक्या बहिणींना १५०० देणार नाही, कारण त्यांची ती ऐपतच नाही. आता मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
न
लाडकी बहीण योजनेबद्दल मंत्री नरहरी झिरवळ यांचे मोठे विधान, म्हणाले, २१०० रूपये…
एकनाथ शिंदे यांनी भाष्य करणे टाळले
नरहरी झिरवळ यांनी केलेल्या विधानाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट म्हटले की, मला नरहरी झिरवळ नेमके काय म्हटले याबद्दल कल्पना नाहीये. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केले. आदिती तटकरे यांनी म्हटले की, एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होतील.

