• Tue. Mar 10th, 2026
    कांद्याचे भाव पडले, उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका; आता सरकारच्या मानगुटीवर बसून.. राजू शेट्टी संतापले

    Raju Shetty on Onion Prices : स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कांद्याचे भाव पडल्यानंतर सरकारवर टीका केली असून सरकारच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    निफाड : केंद्र सरकारने लावलेले निर्यातशुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे भाव पडले. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिले असते, तर कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपयांच्या पुढे गेले असते, असे मत स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेट्टी यांनी सोमवारी लासलगाव बाजार समितीला भेट देऊन कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी, संघटनेचे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. कांद्याचे उत्पादन वाढलेले आहे, याचा अंदाज सरकारला दोन-तीन महिन्यांपूर्वीच आला होता. यावर्षी मध्यप्रदेश व महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन वाढलेले आहे.
    गर्भवतीला उपचार नाकारल्याप्रकरणानंतर आता राज्य सरकारचा मोठा निर्णय, रुग्णालयांसाठी नवे आदेश जारी
    बाजारपेठ ही भावनेवर नाही, तर मागणी आणि पुरवठ्यावर चालत असते. मग गरजेपेक्षा कांद्याचा पुरवठा जास्त होतो म्हटल्यानंतर त्याची पर्यायी व्यवस्था करणे हे सरकारचे काम आहे. सरकारकडे सगळा डेटा उपलब्ध असूनही नियोजन करीत नसल्याने त्याचा तोटा शेतकरी सहन करतो. यावर हमीभाव हा पर्याय आहे. शेतमालासाठी हमीभाव कायदा सरकारच्या मानगुटीवर बसून मंजूर करणार असल्याचेही शेट्टी म्हणाले.
    Sharad Pawar : शरद पवार-अजित दादांची चौथी भेट, ठाकरेंनंतर दोन्ही पवारांचं एकत्र येणं चर्चेत; जवळिकीची कारणं काय?
    बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, उपसभापती ललित दरेकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, संचालक छबुराव जाधव, प्रवीण कदम, सचिव नरेंद्र वाढवणे, व्यापारी मनोज जैन यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृती गारे, संदीप जगताप, कृष्णा घुमरे, अनिता कोल्हे, आत्माराम पगार आदी उपस्थित होते.

    Onion Prices : कांद्याचे भाव पडले, उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका; आता सरकारच्या मानगुटीवर बसून.. राजू शेट्टी संतापले

    … तर नाफेडच्या कार्यालयावर आंदोलन

    नाफेडच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत. बोगस प्रोड्यूसर कंपन्या काढायच्या व त्यांच्यामार्फत कांदा खरेदी करायचा व तो पुन्हा अशा वेळी मार्केटमध्ये विकायचा की पुन्हा बाजारात घसरण झाली पाहिजे. नाफेडने सहकारी संस्थांमार्फत प्रत्यक्ष बाजार समितीत उतरून कांदा खरेदी करावा, जेणेकरून स्पर्धा निर्माण होऊन कांद्याचे बाजार भाव वाढतील व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी मागणी शेट्टी यांनी केली. दर न वाढल्यास दिल्लीच्या नाफेडच्या कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed