Pune Tanker Crushes Doctor to Death : डॉ. ईश्वर साहू हडपसरच्या दिशेने येत होते. सातवडी पीएमपी बस थांब्यावर एक बस थांबली होती. त्याच्या पाठीमागे साहू होते. पाठीमागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
डॉ. ईश्वर साहू (वय 26 वर्ष, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, मूळ रा. छत्तीसगड) असे मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी टँकर चालक राजेंद्र एकनाथ तळेकर (वय 51, रा. वीर, ता. खंडाळा, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे. आप्पासो भीमराव सबळकर (वय 40, रा. वेताळबाबा, गाडीतळ, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.
कसा झाला अपघात?
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी डॉ. ईश्वर साहू हडपसरच्या दिशेने येत होते. सातवडी पीएमपी बस थांब्यावर एक बस थांबली होती. त्याच्या पाठीमागे साहू होते. पाठीमागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
Shirish Valsangkar : गृहकलहातील गोपनीय गोष्टी मनीषाला माहिती, मोबाईलमध्ये क्लिपही… डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात ट्विस्ट
टँकरखाली डोकं चिरडलं, उपचाराआधीच गतप्राण
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने डॉ. साहूंचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. नागरिकांनी धाव घेऊन रुग्णवाहिका व पोलिसांना बोलावून घेतलं आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकर चालक राजेंद्र तळेकर याला अटक करण्यात आली आहे.
Pune Accident : रुग्णसेवेचं व्रत अधुरं, टँकरखाली चिरडून पुण्यात 26 वर्षीय डॉक्टरचा मृत्यू, उपचाराआधीच प्राण सोडले
Manali Ghanwat : मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचे अकस्मात निधन, मृत्यूभोवती संशयाचं धुकं
रुग्णसेवेचं व्रत अधुरं
डॉ. ईश्वर साहू हे मूळचे छत्तीसगड येथील रहिवासी आहेत. आयुर्वेदाचार्य (बीएएमएस) मधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयुर्वेद शिक्षणाचा पुढील अभ्यास व अनुभवासाठी ते हडपसर येथे वास्तव्यास होते. मागील दहा वर्षांपासून ब्रह्माकुमारीजच्या अध्यात्म प्रचारद्वारा सेवा कार्यास त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते.

