• Fri. Mar 6th, 2026
    कृष्णा आंधळे रत्नागिरीत? अज्ञात महिलेच्या दाव्याने खळबळ; धनंजय देशमुख काय म्हणाले?

    Authored byमानसी देवकर | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2025, 9:40 pm

    मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात एका अज्ञात महिलेच्या वावरानं खळबळ उडालीय.. आरोपी कृष्णा आंधळे कुठे होता, काय करतो याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हणत ही महिला देशमुखांच्या घराबाहेर ठाण मांडून बसली. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा तिने सुरूवातीला केला. मात्र पोलीस येताच नाव सांगण्यास तिने नकार दिला. इतकंच नाही तर देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं अशी मागणीही तिनं केली. रात्रभर घरबाहेरील मंडपात झोपून राहिली आणि सकाळी केज पोलीस येताच ती महिला बसमध्ये बसून निघुन गेली. ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती असून पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed