Pune Crime News : राहुल आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून मतभेद सुरू होते. दोघांमधील वाद इतका वाढला होता की, त्यांच्यात सध्या घटस्फोटाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती.
राहुल पटेल मगरपट्टा १५ व्या मजल्यावरून उडी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यातील मगरपट्टा परिसरातील उच्चभ्रू ॲमनोरा टाऊनशिपमध्ये काल शनिवारी पहाटे एक मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. साडेसतरा नळी येथील ॲमनोरा टाऊनशिपच्या एका इमारतीच्या 15व्या मजल्यावरून खाली कोसळल्याने एका 33 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कौटुंबिक कलहाला कंटाळून या तरुणानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. राहुल पटेल (वय 33) असं जीव गमावलेल्या तरुणाचं नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
जागीच दुर्दैवी अंत
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हे गेल्या काही दिवसांपासून फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. राहुल यांचं नुकतंच लग्न झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. काल शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अचानक 15व्या मजल्यावरील फ्लॅटमधून खाली उडी घेतली. प्रचंड उंचीवरून पडल्यामुळे झालेल्या गंभीर दुखापतींमुळे त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. अचानक मोठा आवाज झाल्यानं परिसरातील नागरिक आणि सुरक्षारक्षक हादरून गेले. त्यांनी तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांना माहिती दिली. Tukaram Mundhe : चिक्कीचं पॅकेट घेतलं, उघडताच धक्कादायक दृश्य, जिवंत अळ्या हातावर; तुकाराम मुंढे काय कारवाई करणार?
दोघांमध्ये घटस्फोटाचा खटला प्रलंबित
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तीव्र मतभेद आणि कौटुंबिक वाद सुरू होते. हे भांडण थेट न्यायालयापर्यंत पोहोचलं असून सध्या दोघांमध्ये घटस्फोटाचा खटला प्रलंबित आहे. या वादामुळे मानसिक ताणतणावात असलेल्या राहुल यांनी एकाकीपणातूनच हे पाऊल उचलल्याचं मानलं जात आहे. Dilip Walse Patil: मी एक मिनिटही थांबणार नाही, निवृत्त होईल; दूध भेसळीच्या आरोपांनंतर वळसे पाटलांची मोठी घोषणा
घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट नाही
घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याच्या पथकानं त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून रीतसर पंचनामा केला. राहुल यांच्या फ्लॅटची कसून तपासणी करण्यात आली; मात्र, पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट अथवा चिठ्ठी सापडलेली नाही. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागील नेमकं कारण स्पष्ट करण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा