• Thu. Sep 17th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

| 21 Apr 2025, 9:33 am

पुण्यात साखर संकुल येथे तंत्रज्ञानाविषयी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बैठक होणार आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये काका-पुतणे एकत्र दिसणार आहेत. मनसे आणि शिवसेना ठाकरे एकत्र येतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र सरकारने शाळेमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या घेतलेल्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. यादरम्यान मनसे आणि शिवसेना ठाकरे एकत्र येतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. राज ठाकरे आणि उद्ध ठाकरे यांनी यायला हरकत नाही म्हटलं पण पुढे काय घडतं आणि काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर असून ते दिवसभर पुण्यात असणार आहेत. सर्व घडामोडींसह इतर सर्व क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE UPDATES

  • 09:33 AM, Apr 21 2025

    सरकारी कंपनीचा कारनामा, अर्धा डझन बँकांना 8000 कोटींचा लावला चुना; आणखी वाढतंय कर्जाचं ओझं

  • 09:11 AM, Apr 21 2025

    आपण गेम करणार आहोत; दुचाकीच्या वादातून दाजी-मेहुण्याचा जीव घेतला, मृत तरुणाची पत्नीच ताब्यात, महाराष्ट्रात खळबळ

  • 09:11 AM, Apr 21 2025

    पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांवर पुन्हा एकदा मधमाश्यांचा हल्ला, तुम्हीही करू नका ही चूक

  • 09:10 AM, Apr 21 2025

    वरळी सी फेसवर गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, काचेचा तुकडा पाठीत खुपसल्यामुळे महिला गंभीर जखमी, परिसरात खळबळ

  • 09:10 AM, Apr 21 2025

    शेतकऱ्यांना कर्जमाफी हवीच; सातबारा कोरा करण्याचा राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

  • 09:10 AM, Apr 21 2025

    ‘खरी कसोटी माझी आहे…’ नव्या भूमिकेविषयी काय म्हणाल्या सुकन्या मोने? २ वर्षांनी TV विश्वात करतायंत कमबॅक

  • 09:10 AM, Apr 21 2025

    मुंबई २६/११ हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; भाजपचे माधव भांडारींचा खळबळजनक दावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed