• Thu. Sep 17th, 2026

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उच्च न्यायालयाच्या खंडपीठात ध्वजारोहण – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 17, 2026

छत्रपती संभाजीनगर, दि. १७ (विमाका): मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या प्रांगणात न्यायमूर्ती नितीन बी.सूर्यवंशी यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविली. त्यानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

यावेळी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील न्यायमूर्ती संदीपकुमार सी.मोरे, किशोर सी.संत, आर.एम.जोशी, जितेंद्र शांतिलाल जैन, मंजुषा अ.देशपांडे, सचिन एस.देशमुख, अजित बी.कडेठाणकर, सिद्धेश्वर एस.ठोंबरे, वैशाली पाटील-जाधव, अबासाहेब धर्माजी शिंदे तसेच एस.जी.चपळगावकर उपस्थित होते.

तसेच खंडपीठातील सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे, प्रबंधक (प्रशासन) उमाकांत सी.देशमुख, प्रबंधक (न्यायिक) राजेश सासणे यांच्यासह न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed