• Fri. Sep 18th, 2026

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 17, 2026

छत्रपती संभाजीनगर, दि. १७ (विमाका): मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

यावेळी अपर विभागीय आयुक्त प्रताप काळे, अपर विभागीय आयुक्त खुशालसिंह परदेशी, अपर विभागीय आयुक्त‌ रिता मेत्रेवार, सह आयुक्त मंजुषा मिसकर, सह आयुक्त सर्जेराव सोनवणे, सहआयुक्त ज्ञानोबा मोकाटे, सहआयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed