• Wed. Mar 11th, 2026
    जागेचा वाद, रस्त्यात अडवलं, मग तरुणाला काठी, दगडाने मारहाण, जागीच जीव गेला, पुणे हादरलं

    Pune Crime News: पुण्यात एका तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. या तरुणाला रस्त्यात अडवून त्याला जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे.

    Lipi

    प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे: पुण्यातील कात्रज भागातील संतोषनगर येथे जागेच्या वादातून तीन सराईत गुन्हेगारांनी एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण कात्रज परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शुभम सुभाष चव्हाण असे मृत तरुणाचे नाव असून, अमर साकोरे आणि त्याच्या दोन साथीदारांवर खुनाचा आरोप करण्यात आला आहे.

    रस्त्यात अडवलं, जागेच्या व्यवहारावरुन वाद अन् मग शुभमची निर्घृण हत्या

    याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी (दि. 20 एप्रिल) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास शुभम चव्हाण हा संतोषनगर येथे आपल्या घरी जात होता. त्यावेळी अमर साकोरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी शुभमला अडवलं आणि जागेच्या व्यवहाराबाबत विचारणा केली. यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा शाब्दिक वाद काहीच वेळात विकोपाला गेला. तेव्हा धोका लक्षात येताच शुभम तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, अमर साकोरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी शुभमचा पाठलाग करत त्याला पकडलं. या आरोपींना शुभमला लाकडी बांबू, काठी, दगड आणि विटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात शुभमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
    Telangana Shocking News: बॉयफ्रेण्डसाठी पोटच्या तीन लेकरांना दह्यातून विष दिलं, नवरा उपाशीच घरातून निघाला अन्…

    आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले

    या घटनेनंतर अमर साकोरे आणि त्याचे दोन साथीदार घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना केल्याची माहिती आहे. तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पोलिस तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत, अशीही माहिती आहे.

    या खुनाच्या घटनेमुळे संतोषनगर आणि कात्रज परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. तसेच, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed