गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेली १२४० कोटी रुपयांची भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये जमा न केल्याने १०० कोटी रुपयांचे व्याज बुडाल्याची माहिती समोर आली आहे. तसा आरोप करण्यात आलाय.
एसटी कर्मचाऱ्यांचा २०१८ पासूनचा महागाई भत्ता मिळालेला नसल्याने कर्मचारी नाराज आहेत. आता त्यामध्ये एक मोठी माहिती ही पुढे येताना दिसतंय. एसटी कर्मचाऱ्यांना व्याज बुडीत असून १२४० कोटींची रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये भरलीच गेली नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ गुंतवणुकीतील १०० कोटींचे व्याज बुडीत गेले आहे. १२४० कोटींची कपात केलेली रक्कम पीएफमध्ये भरलीच गेलेली नाहीये. यामुळे व्याज बुडीत आहे.
Mumbai News : मुंबई महापालिकेच्या कारवाईचा देशभरातील जैन समुदायाकडून निषेध, विलेपार्लेमध्ये सर्व पक्षीय निषेध रॅली, प्रकरण काय?महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगेंनी ही माहिती दिलीये. फेब्रुवारी २०२४ पासून पीएफची आणि ग्रॅज्युटीची रक्कम ही भरली गेलीच नाहीये. मात्र, कर्मचाऱ्यांच्या पगारीतून ही रक्कम कपात होतोय. रक्कम भरली गेली नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ गुंतवणुकीतील १०० कोटींचे व्याज बुडीत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या समस्या या पुढे येताना दिसत आहेत. त्यामध्येच आता ही पीएफच्या रक्कमेची बाब पुढे आलीये.
ST कर्मचाऱ्यांचे व्याज बुडीत, १२४० कोटींची कपात केलेली रक्कम पीएफमध्ये भरलीच नाही, कोणी केला गंभीर आरोप?
एसटीचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारातून ही पीएफची १२४० कोटींची रक्कम कपात करण्यात आली. मात्र, ती भरण्यात आली नाही. यामुळेच व्याज बुडीत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर होत नसल्याचाही आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जातो. पगार सात तारखेला होत नाहीत, कधी आठ, कधी दहा तारखेला पगार होतो. मुळात म्हणजे मागील काही वर्षांपासूनच एसटी महामंडळाची दैनिय अवस्था झाल्याचे बघायला मिळतंय. ग्रामीण भागांमध्ये भंगार झालेल्या एसटी बस रस्त्यावर धावतात.

