Thane Hospital News : पाच वर्षात गरीब रुग्णांसाठी वापरलेला निधी वेबसाईटवर जाहीर करा, अशी मागणी भाजप नेत्याने केली असून रुग्णालयांवर अधिक बिलं आकारण्याचा आरोप केला आहे.
Thane News : डिपॉझिट सक्तीचा आरोप, धर्मादाय रुग्णालयांनी गरीब रुग्णांवरील खर्च जाहीर करावा, भाजप नेत्याची मागणी
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट न भरल्यामुळे महिलेचा उपचार न झाल्यामुळे मृत्यू झाला. तसेच गरीब रुग्णांसाठीच्या सुमारे ३५ कोटी रुपयांचा खर्च केला नसल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील तीन हॉस्पिटलकडे नारायण पवार यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. पाचपाखाडी येथील कौशल्य मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट हॉस्पिटल आणि लुईसवाडी येथील श्री महावीर जैन हॉस्पिटल आणि प्रताप जे. आशर कार्डिअॅक सेंटरला महापालिकेने जागा दिली आहे. तर ठाण्यातील पोखरण रोड क्र. २ येथील बेथनी हॉस्पिटल हे धर्मादाय हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे.
Rupali Chakankar : तनिषा भिसेंना ५ तास रक्तस्राव, तरी उपचाराविना ठेवलं, चाकणकर भडकल्या, ‘दीनानाथ’वर ठपका
कौशल्य आणि बेथनी हॉस्पिटलमध्ये गरीब व दुर्बल घटकांसाठीच्या राखीव जागांचा तपशील हा सामान्य नागरिकांना समजू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी उपलब्ध जागा व उपचार घेणाऱ्या रुग्णांची नावे रुग्णालयाच्या वेबसाईटवर जाहीर करावी. श्री महावीर जैन हॉस्पिटलमधील १० टक्के बेड गरीब रुग्णांसाठी मोफत उपलब्ध व्हावेत, यासाठी कार्यवाही सुरू करावी. अन्यथा, या ट्रस्टला महापालिकेने दिलेली इमारत पुन्हा परत घ्यावी, अशी मागणी माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.
Thane News : डिपॉझिट सक्तीचा आरोप, धर्मादाय रुग्णालयांनी गरीब रुग्णांवरील खर्च जाहीर करावा, भाजप नेत्याची मागणी
ठाणे शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या खर्चाची निश्चित रक्कमेची माहिती आधी रुग्णांच्या नातेवाईकांना द्यावी. महापालिका क्षेत्रातील खासगी हॉस्पिटलची तपासणी करून नोंदणीचे वा नुतनीकरणाचे अधिकार महापालिका प्रशासनाकडे आहेत. त्यावेळी या संदर्भात शहरातील खासगी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला नियमानुसार योग्य सूचना द्याव्यात, असे नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

