• Fri. Mar 20th, 2026
    तनिषा भिसे प्रकरणात ससूनचा अहवाल, गंभीर निष्कर्ष समोर; कुटुंबियांसह रुग्णालयांवर ठपका?

    Tanisha Bhise Death Case: भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा यांचा प्रसुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. जुळ्या बाळांना जन्म देऊन त्यांनी जगाचा निरोप घेतला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अभिजीत दराडे, पुणे: भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा यांचा प्रसुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. जुळ्या बाळांना जन्म देऊन त्यांनी जगाचा निरोप घेतला. या प्रकरणात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले. मंगेशकर रुग्णालयानं रुग्णाच्या कुटुंबाकडे १० लाख रुपयांची मागणी केली. पैसे नसतील, तर उपचार होणार नाहीत, अशी भूमिका रुग्णालयानं घेतली. त्यामुळे तनिषा यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, असा दावा करत भिसे कुटुंबानं केला. त्यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले. या सगळ्या प्रकरणाची चौकशी ससून रुग्णालयानं केली आहे. ससूनचा अहवाल समोर आला असून त्यात अनेक गंभीर बाबी आहेत.

    Tanisha Bhise Death Case: तनिषा भिसे प्रकरणात ससूनचा अहवाल, गंभीर निष्कर्ष समोर; कुटुंबियांसह रुग्णालयांवर ठपका?

    ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालातील काही प्रमुख निष्कर्ष समोर आले आहेत.

    १. इंदिरा IVF मध्ये तब्येतीत सुधारणा होत नसताना देखील 4-5 दिवस दाखल करून घेणं ही चूक होती.

    २. तब्येतीत सुधारणा होत नसल्याचं स्पष्ट झालेलं असताना तनिषाला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करायला पाहिजे होतं.

    ३. मंगेशकर रुग्णालयात पाच तास थांबवलं होतं. मात्र या वेळी पैसे घेतले की नाही किंवा हेच कारण होतं का? पैसे द्या नाही तर उपचार करणार नाही, असे प्रश्न होते. याबाबत आरोग्य उपसंचालकांनी चौकशी करून अहवाल द्यायचा आहे. याची चौकशी आरोग्य उपसंचालकांनी केली आहे.

    ४ अति जोखमीची परिस्थिती असताना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती. मात्र ते करण्यात आलं नाही. तनिषा यांना सूर्या रुग्णालयात नेण्यात आलं. इथे डिलिव्हरी झाली. मात्र रुग्णालयात कोणताही कार्डिऍक स्पेशालिस्ट उपलब्ध नव्हता. तिला हार्ट अटॅकचा धोका वाढला आणि जवळपास दोन तास सीपीआर देत होते.

    ५. सदरील रुग्णाची वैद्यकीय परिस्थिती गुंतागुंतीची होती. तनिषा यांचा मृत्यू मणिपालमध्ये झाला. हा माता मृत्यू असतानाही त्यांनी शवविच्छेदन केलं नाही. ससून रुग्णालयाला त्यांनी मृत्यू झाल्यानंतर कळवणं गरजेचं होतं. पण ते झालेलं नाही.

    ६. या सगळ्यात IVF सेंटरची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यांनी लवकर रेफर करायला हवं होतं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed