• Sun. Mar 8th, 2026

    Ranjit Kasale : पुण्यात येताच रणजित कासलेंचा EVM मशीनबद्दल खळबळजनक दावा

    Ranjit Kasale : पुण्यात येताच रणजित कासलेंचा EVM मशीनबद्दल खळबळजनक दावा

    Ranjit Kasale Allegations : निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. मतदानाच्या दिवशी त्यांच्या खात्यात 10 लाख रुपये आले, जे वाल्मिक कराड यांच्या कंपनीतून आले असल्याचा दावा त्यांनी केला. माजी मंत्री धनंजय मुंडे यांची कॅश पकडल्याने हे पैसे मिळाल्याचे कासले यांचे म्हणणे आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : बीडचे निलंबित पोलीस अधिकारी आज रात्री पुण्यात दाखल झाले. आपण पोलिसांकडे सरेंडर होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी खळबळजनक दावा केला. “मतदानाच्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आले. वाल्मिक कराडची संत बाळूमामा कंस्ट्रक्शन अंबाजोगाई कंपनी आहे. त्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीतून माझ्या अकाउंटला 10 लाख आहे. त्यापैकी साडेसात लाख रुपये आले. अडीच लाखांमध्ये माझा बाकीचा उरलेला खर्च चालू आहे. पगारातील सेव्हिंग आणि त्यातून माझा खर्च सुरु आहे. राहिलेले अडीच लाखही प्रामाणिकपणे देईन”, असं रणजित कासले म्हणाले.

    “मी माजी मंत्री धनंजय मुंडेंची कॅश पकडली होती. तसेच ईव्हीएमजवळ तुम्ही थांबायचं नाही यासाठी माझ्या अकाउंटवर 10 लाख रुपये दिले. वाल्मिक कराड मला भेटले होते. परळीच्या जवळ राखेच्या सेंटरजवळ आमची भेट झाली होती. आमची ज्या मंगल कार्यालयात राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते. मला शांत राहायला सांगितलं होतं. लोकसभेला बोगस मतदार करु दिलं नव्हतं. यावेळी शांत राहा असं सागितलं होतं. बीडचे अॅडीशन एसपी जे चार वर्षांपासून आहेत, एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत ते वाल्मिक कराडचे हस्तक आहेत’, असे गंभीर आरोप रणजित कासले यांनी केले.

    “ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं. ईव्हीएमला जी काही छेडछाड होईल, ते गप्प बसायचं आणि सहन करायचं. परळीला जेव्हा मतदानावेळी अपुरं मनुष्यबळ होतं त्याचवेळी कासलेंना का काढलं? माझी परळीला ईव्हीएम मशीन जवळ पोस्टिंग होती”, असं रणजित कासले म्हणाले.

    रणजित कासले यांचे ADG निखिल गुप्तांवर गंभीर आरोप

    “ज्याप्रकारे एका बिल्डरच्या सांगण्यावरुन, तो सुरतचा बिल्डर आहे, जो माझा 5 वर्षांपासूनचा मित्र आहे, त्याच्या घरी मी गेलो. त्याच्या घरी मी थांबलो. त्याच्या ऑफिसमध्ये मी थांबलो. तिथे मी आराम केला. ते फोटो आणि बँक अकाउंटला आलेल्या पैशांचे फोटो दाखवणार आहे. पैसे आले आहेत, पण कुणाच्या अकाउंटला आहेल आहेत, माझ्या अकाउंटला जेवढे 10 लाख रुपये आले तेवढेच त्या अकाउंटला देखील आले आहेत. धनंजय मुंडे यांचे ते पैसे आले आहेत. पण त्यांनी ते चुकीचे दाखवले आहेत. त्यावरुन मला एडीजी निखिल गुप्ता यांनी बिल्डरच्या सांगण्यावरुन सहा तासात सस्पेंड केलं आहे. म्हणजे निखिल गुप्ता आणि त्यांची पार्टनरशिप आहे. राज शॉपिंग सेंटर, निधी शॉपिंग सेंटर हे निखिल गुप्तांचे आहेत. त्यांनी माझी 6 तासात चौकशी केली आणि निलंबित केलं. विशेष म्हणजे पत्र यायला 24 तास लागतात”, असा आरोप रणजित कासले यांनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *