Maharashtra Weather Forecast : हवामान खात्याने आजही अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गोदिंया, यवतमाळ, अमरावती, नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे.
विदर्भात विजांच्या कडकडाटासह वारे आणि पावसाचा येलो अलर्ट
राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण आहे. आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह वारे आणि पावसाचा येलो अलर्ट हा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच चंद्रपूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालाय. बह्यपुरीत सर्वाधिक तापमानाची नोंद झालीये. इतके दिवस विदर्भात उष्णता वाढताना दिसत होती. अवकाळीने हजेरी लावली असतानाही विदर्भात पारा वाढताना दिसला.Maharashtra Weather Update : पावसाचा इशारा कायम, मराठवाड्यासह विदर्भात बरसणार अवकाळी पाऊसमहाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मोठा फटका
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे बघायला मिळाले. मुंबई आणि उपनगरांमध्ये आज तापमान सामान्य राहिल. यंदाच्या वर्षी पाऊस चांगला होणार असल्याचा देखील अंदाज आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके बसतात. मात्र, यंदा पाऊस पडतोय. मार्च महिन्यातच उष्णता सातत्याने वाढताना दिसली. दोनदा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता.
गोदिंया, यवतमाळ, अमरावती, भंडारा, नागपूरमध्ये पावसाची शक्यता
मार्च महिन्याच्या शेवटी आणि एप्रिलच्या सुरूवातीपासूनच राज्यात अवकाळी पाऊस अनेक भागांमध्ये कोसळताना दिसतोय. आता अवकाळीचे ढग हे विदर्भाकडे फिरले आहेत. गोदिंया, यवतमाळ, अमरावती, भंडारा, नागपूर, अकोला, बुलढाणा, भंडारा, वाशिम,वर्धा याठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आली आहे. राज्यातील इतर ठिकाणीही ढगाळ आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.