• Fri. Apr 25th, 2025 4:20:57 AM

    Hemlata Patil: हेमलता पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; दीड महिन्यांतच मोठा निर्णय का?

    Hemlata Patil: हेमलता पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; दीड महिन्यांतच मोठा निर्णय का?

    Hemlata Patil: काँग्रेसने त्यांच्या नाराजीची दखल घेतली नसल्याने अखेरीस ११ फेब्रवारी २०२५ रोजी पाटील यांनी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.

    महाराष्ट्र टाइम्स
    hemlata patil

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: विधानसभा निवडणुकीत डॉ. पाटील या काँग्रेसकडून मध्य विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. परंतु, ‘मविआ’त ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्यामुळे त्यांना बंडाची तलवार म्यान करावी लागली होती. त्यामुळे डॉ. पाटील या नाराज होत्या. काँग्रेसने त्यांच्या नाराजीची दखल घेतली नसल्याने अखेरीस ११ फेब्रवारी २०२५ रोजी पाटील यांनी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.

    डॉ. हेमलता पाटील यांनी दोन महिन्यांतच शिवसेना शिंदे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला. पक्षाला तसेच कामाला न्याय देऊ शकत नाही असे सांगत आपण यापुढे शिंदे गटाचे काम करणार नसल्याचे डॉ. पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे. शिंदे गटातील गटबाजीमुळे अन्य पक्षातून आलेल्यांची कोंडी होत आहे. त्यामुळे या गटबाजीला अनेक जण कंटाळले असून, शिंदे गटातून आता आउटगोइंग सुरू झाल्याची चर्चा आहे.

    सरकारी योजनांच्या निधीवर डल्ला! ‘संजय गांधी’, ‘श्रावणबाळ’सारख्या योजनेत अपहाराचा आरोप करत जनहित याचिका
    शिंदे गटातील गटबाजीमुळे ‘आउटगोइंग’
    शिवसेना शिंदे गटात सध्या मोठ्या प्रमाणावर गटबाजी उफाळून आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधील दोन्ही गटांना एकत्र बसवून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तरीही गटबाजी कायम आहे. ठाकरेंसह काँग्रेसमधून आलेल्या माजी नगरसेवकांना कोणत्या गटात राहायचे, कोणाच्या संपर्कात राहायचे असा पेच आहे. त्यामुळे अनेकांनी पक्षापासून अंतर राखले आहे. यामुळे डॉ. पाटील यांनी थेट बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
    Sanjay Raut: ‘तो’ आका मंत्रिमंडळात! सिंधुदुर्ग हत्याकांडप्रकरणी खासदार संजय राऊत यांचा आरोप
    शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असला तरी पक्षाला व माझ्या कामाला न्याय देऊ शकत नव्हते. त्यामुळे तूर्तास कोणत्याही पक्षात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून यापुढे जनतेच्या संपर्कात राहील.– डॉ. हेमलता पाटील

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed