MLA sandip joshi on Vijay Wadettiwar : आमदार संदीप जोशी यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर मंगेशकर कुटुंबाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली आहे.
वडेट्टीवारांशी आमचे संबंध वाईट नाहीत आणि मंगेशकर कुटुंबीयांशी आमचे हितसंबंधही नाहीत, मात्र वडेट्टीवारांच्या आरोपांमुळे कलाप्रेमी दुखावले गेले आहेत, असे नमूद करत जोशी यांनी पत्रकातून वडेट्टीवारांचा निषेध केला. वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.Pune News : गर्भवतीला पैशासाठी ताटकळत ठेवून उपचार नाकारले, मंगेशकर कुटुंबीय अजूनही शांत का? काँग्रेस नेत्याचा सवाल
लता दीदींच्या दातृत्वाचे दाखले देणारे पत्रक
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील रुग्णाच्या मृत्यूवरून वडेट्टीवार यांनी अलीकडेच मंगेशकर कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. आमदार जोशी यांनी लता मंगेशकर यांच्या दातृत्वाचे दाखले देणारे पत्रक प्रसिद्धीला देत त्यांचा समाचार घेतला. १९६२ आणि १९६५ च्या युद्धात लतादीदींनी अनेक कार्यक्रमांतून लाखो रुपयांच्या देणग्या गोळा केल्या आणि शहीदांच्या आणि जखमी झालेल्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी सैन्यदलाकडे सोपवल्या. गोवा मुक्ती संग्रामात त्यांचे योगदान मोठे होते. १९८३ मध्ये विपरीत परिस्थितीत क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी लतादीदींनीच निधी उभारला. दादरा नगर हवेलीच्या मुक्तीमध्ये लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी संगीताच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली. करोना साथीच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये दिले, याकडे पत्रकातून लक्ष वेधण्यात आले आहे.Rupali Chakankar : तनिषा भिसेंना ५ तास रक्तस्राव, तरी उपचाराविना ठेवलं, चाकणकर भडकल्या, ‘दीनानाथ’वर ठपका
लता मंगेशकरांकडून एक कोटी रुपये सैन्याला दान
पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी लता मंगेशकरांनी वडिलांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून एक कोटी रुपये सैन्याला दान केले. देशावरील संकटक्षणी लतादीदींच्या आवाजाने आणि मंगेशकर कुटुंबाच्या संगीत साधनेने भारतीयांचे देशप्रेम जागृत केल्याचेही आमदार जोशी यांनी म्हटले आहे. दिवंगत लता मंगेशकर ‘भारतरत्न’सह देशातील व राज्यातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांच्या कुटुंबीयातील आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर यांनाही सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत. वडेट्टीवार यांच्या परिवारात एखादा त्या दर्जाचा सन्मान मिळाला असल्यास तो त्यांनी जाहीर करावा, असे आवाहन आमदार संदीप जोशी यांनी केले.Pune News : तनिषा भिसेच्या कुटुंबियांनी एकनाथ शिंदेंची आर्थिक मदत नाकारली, ५ लाखांची रक्कम घेण्यास नकार
पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लता मंगेशकर यांना आवडणारे नेतृत्व होते. मंगेशकर कुटुंबीयांनी आपल्या कलासाधनेतून संपत्ती कमावली. अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज रुग्णालय उभारले. रुग्णालयाच्या ट्रस्टच्या कमाईत मंगेशकर कुटुंबीय लाभार्थी नाहीत. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी लतादीदींची प्रशंसा केली आहे.
MLA Sandip Joshi : विजय वडेट्टीवार यांच्या परिवाराने अधिक दान केल्याचे सांगावे, जाहीर माफी मागू; आमदाराचे आव्हान
‘ए मेरे वतन के लोगो…’ या स्वरामुळे पंडित नेहरुंचे डोळे पाणावले होते. काडीकचरा गेल्यामुळे नव्हे. दीनानाथ रुग्णालयात दहा लाख डिपॉझिट भरायला सांगणारे डॉक्टर मंगेशकर कुटुंबीयांचे नातेवाईक आहेत का, याचा वडेट्टीवारांनी शोध घ्यावा. ‘इंदिरासागर’ धरणाच्या भ्रष्टाचारासाठी संपूर्ण गांधी कुटुंबीयांना दोषी धरायचे का? असा प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला. विजय वडेट्टीवारांचे मंगेशकर कुटुंबीयांवरील आरोप पक्षातील डळमळीत पद सावरण्याच्या हेतूने केले आहेत, असेही जोशी, खोब्रागडे, माटेगावकर आणि ढोमणे यांनी म्हटले आहे.