• Wed. Apr 23rd, 2025 3:42:25 PM
    वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरच्या दाव्यावर अजितदादा स्पष्टच बोलले, रणजीत कासलेंबद्दल केली मोठी टिप्पणी

    Ajit Pawar on Walmik Karad Encounter : निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी ‘मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती’ असा दावा केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अजित पवारांनाही (Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : वाल्मिक कराडच्या (Walmik Karad Encounter) एन्काऊंटरच्या दाव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी ‘मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती’ असा दावा केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही (Ajit Pawar) प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांना वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबद्दल त्यांचे मत विचारले असता ते म्हणाले, ‘मला याबाबत अधिक काही माहिती नाही. मात्र निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचे किती मनावर घ्यायचे हे ठरवायला हवे,’ असे मत अजित पवारांनी मांडले आहे.
    Ranjit Kasle: कराडच्या एन्काऊंटरसाठी मला ५० कोटींची ऑफर! सनसनाटी दावा करणारे रणजीत कासले कोण?
    रणजीत कासलेंनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बद्दल दावा केला होता. तर आपल्याला कोट्यावधींची ऑफर मिळाल्याचे व्हिडिओमध्ये सांगितले होते. यावेळी त्यांनी असेही म्हटले की, ‘एन्काऊंटर करण्यासाठी म्हणाल तेवढी ऑफर दिली जाते. १० कोटी, २० कोटी, ५० कोटी रुपयेही दिले जातात.’ त्यांच्या या दाव्यामुळे पोलीस प्रशासनात देखील खळबळ उडाली आहे. तर राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु झाल्याचे चित्र आहे.

    कासले यांचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. तो म्हणजे धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी प्रयत्न केले होते, असा खळबळजनक त्यांनी केला. कराड मुंडे यांचे काही प्रकरणं बाहेर काढणार होते. त्यामुळे मुंडेंना करोड नको होते, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात कोणते नवे कंगोरे समोर येतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

    रणजीत कासले कोण?

    कराडच्या एन्काऊंटरचा दावा करणारे रणजीत कासले हे बीडच्याच सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. कासलेंवर अनेक आरोप असल्याने ते नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. सायबर विभागात दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी ते परवानगीशिवाय परराज्यात गेले होते. हा ठपका त्यांच्यावर होताच. पण त्यांनी आरोपींकडून पैशांची देवाणघेवाण केल्याचाही गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed