Dowry Cases In Mumbai : सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी महिलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या छळण्यात येत असून, मुंबईत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत असे १२६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी (२०२४) मुंबईत हुंडयासाठी कौटुंबिक छळाचे ४५८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या तीन महिन्यांतच आकडा सव्वाशेपार झाल्याने सरासरीमध्ये किंचित वाढ दिसते.Nitin Gadkari: दहा लाख कोटींचे रस्ते, महामार्ग; येत्या दोन वर्षांसाठी नितीन गडकरींचा महत्त्वाकांक्षी संकल्प
हुंड्यासाठी ‘मंगळदोष’
अग्रगण्य फॅशन कंपनीत उच्चपदावर असलेल्या महिलेचे लग्न एका संकेतस्थळावरून जमले. दोघांनी न्यायालयात जाऊन लग्न केले आणि नंतर कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी आधी संताप व्यक्त केला. मात्र नंतर रितीरिवाजानुसार लग्न लावून दिले. मुलीला मंगळ दोष असल्याने तीन लाख खर्च येईल, असे सांगून सासरच्यांनी पैसे घेतले. लग्नासाठी ९ लाख खर्च करायला लावले. काही महिने संसार सुरळीत चालला, मात्र नंतर सासरच्यांनी आपल्या रंग दाखवण्यास सुरुवात केली. कधी मंगळदोष, कधी जेवण बनविण्यास येत नाही, अशी कारणे पुढे करून माहेरून पैसे आणण्यासाठी त्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी देवनार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीने दिली पत्नीला साथ
आयटी कंपनीत काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीचे बँकेत नोकरी करणाऱ्या तरुणासोबत लग्न जमले. बोलणीच्या बैठकीलाच आईवडिलांनी आमच्यात हुंड्याची प्रथा असल्याचे सांगितले. मुलीकडचे यासाठी तयार नव्हते. होणारा पतीदेखील हुंड्याच्या विरोधात होता. कसेबसे घरच्यांना राजी करून दोघांनी लग्न केले. चार ते पाच महिने चांगले गेल्यानंतर सासरच्यांनी टोमणे मारणे सुरू केले. सुनेकडे सगळा पगार मागून घेणे, लग्नातील दागिने आपल्या ताब्यात ठेवणे, घरातील कामावरून मानसिक त्रास देण्यात आला. अशा परिस्थितीत पतीने मात्र तिची साथ सोडली आणि दोघे घराबाहेर पडले आणि स्वत्रंत राहू लागले. तरुणीच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उकडतंय म्हणून घराबाहेर झोपले, सख्ख्या भावंडांवर मृत्यूचा एकत्रच घाला; नाशिकमध्ये दोघांचा करुण अंत
चारित्र्यावर संशय
माहेरून पैसे आणत नाही म्हणून गर्भवती महिलेच्या चारित्र्यावरच संशय घेण्यात आल्याचा प्रकार ट्रॉम्बेमध्ये घडला. गर्भवती राहिल्याने महिलेला डॉक्टरने जड काम करू नये, असा सल्ला दिला. त्यानुसार ही महिला हलके काम करू लागली. घरातील सर्व कामे करत नाही म्हणून सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. मानसिक त्रासाची पातळी इतकी खाली घसरली की, पोटातील मूल कोणाचे आहे, असा प्रश्न उपस्थित करून हिची डीएनए चाचणी करा, असे वारंवार बोलू लागले. पतीदेखील घरच्यांची बाजू घेत असल्याने महिलेने अखेर पोलिसांत धाव घेतली.सरकारी योजनांच्या निधीवर डल्ला! ‘संजय गांधी’, ‘श्रावणबाळ’सारख्या योजनेत अपहाराचा आरोप करत जनहित याचिका
चालू वर्षातील गुन्हे
(जाने-मार्च २०२५)
गुन्ह्याचा प्रकार आणि संख्या
हुंड्यामुळे मृत्यू —१
आत्महत्या —५
मानसिक, शारीरिक छळ —१२०
वर्ष आणि गुन्ह्यांची नोंद
२०२३ —७६६
२०२४ —४५८
२०२५ —१२६ (जानेवारी ते मार्च)