Atul Save on Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळते. अतुल सावेंनी शिरसाट यांना ‘खैरे नका होऊ, खैरे नका होऊ, खैरेंसारखं करू नका, आता लोकांनी खैरेंना मग… शब्द तोंडात ठेवत टोला लगावला आहे.
सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमधील मंत्री आमदार खासदार यांनी उद्घाटन भूमिपूजनांचा धडाका लावला आहे. यामध्ये सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांचा देखील समावेश आहे. पालकमंत्री असल्याने अनेक ठिकाणी संजय शिरसाट यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण असतं. मात्र अनेकवेळा संजय शिरसाट कार्यक्रमांना पोहोचतात मात्र त्यांना उशीर झालेला असतो. यामुळे अनेक ठिकाणी मान्यवर व नागरिकांना ताटकळत बसावं लागतं. याबाबत अनेक नेते तक्रार देखील करतात. स्नेहभोजन, मग Amit Shah यांची शिंदे-फडणवीसांसोबच रात्री उशिरा बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडतंय?
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी विविध कामांचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्याचे योजिले होते. यासाठी नियोजित कार्यक्रमाची वेळ सकाळी ११ वाजताची होती. कार्यक्रमाच्या वेळेनुसार सर्व मान्यवर कार्यक्रमस्थळी दाखल झाले. यात मंत्री अतुल सावे देखील होते. तब्बल दीड तास होऊन मंत्री संजय शिरसाठ आलेच नाही. तब्बल दीड तास वाट बघितल्यानंतर कार्यक्रमाच्या गेटवर आले. सावेंनी मनपा आयुक्त जी श्रीकांत त्यांच्या फोनवरून संजय शिरसाट यांना कॉल केला. यावेळी सावे म्हणाले, असं नका करू यार लोकांना, खैरे नका होऊ, खैरे नका होऊ, खैरेंसारख करू नका आता लोकांनी खैरेंना मग…शब्द तोंडात ठेवत मंत्री अतुल सावेंनी संजय शिरसाठ यांना चिमटा काढला.दोघांमधील संवाद मोबाईल कॅमेरात कैद झाला.
मंत्री संजय शिरसाट मंत्री अतुल सावे यांच्यातील हा कलगीतुरा वाढत गेला. शेवटी महानगरपालिकेच्या कार्यक्रमासाठी महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं. मात्र याच महापालिका आयुक्तांच्या बदलीवरून या दोन्ही मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली होती.