Dharashiv News : निलेश घायवळ, पैलवानमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
पुणे येथील कुख्यात गुंड निलेश घायवळ व अहिल्यानगर येथील पैलवान यांची कुस्तीच्या आखाडयातच फ्री स्टाईल हाणामारी धांद्रुडकरांना पहायला मिळाली. भूम तालुक्यातील धांद्रुड येथे वार्षिक जत्रेत परंपरेनुसार कुस्त्याचे आयोजन केले होते. या कुस्तीच्या फडात निलेश घायवळच्या श्रीमुखात पैलवानने लावली, नंतर घायवळ समर्थकानी पैलवानाला मारहाण केली.