Mumbai-Goa National Highway: अमित शहा हे रायगड दौऱ्यावर येणार असल्याने १२ एप्रिलला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना वाहतूक बंदी असणार आहे.
12 एप्रिल रोजी किल्ले रायगडावर जाण्यासाठी वाहनांची गर्दी वाढणार असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या दिवशी
जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढला आहे.
रायगड किल्ला येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 345वी पुण्यतिथी 12 एप्रिल रोजी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे अनेक मंत्री देखील यावेळी किल्ले रायगडावर येणार आहेत तसेच राज्यातील हजारो शिवभक्त या दिवशी छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी वाहनाने येत असतात. यामुळे गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंत जड-अवजड वाहनांमुळे जागोजागी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 12 एप्रिल रोजी मध्यरात्री बारा नंतर दुपारी तीन वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी करण्यात आली आहे. यामधून जिवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहीका, तसेच महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळण्यात आली आहेत.Raigad Accident: दुचाकीला टेम्पोची धडक अन् डोळ्यादेखत सारं संपलं, दोघांचा बाबा गेला, रायगडमध्ये हळहळ
तसेच, सुरक्षा कारणास्तव पोलिसांचा फौजफाटा किल्ले रायगड व परिसरात तैनात करण्यात आला असून या दिवशी सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत रायगडाच्या दोन किलोमीटर परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॅडग्लायडर्स इत्यादींच्या वापरावर बंदी घातली आहे.
शिवछत्रपती महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रायगडावरील महाराजांच्या समाधीला मानवंदना दिपवंदना दिली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.