पिंपरीत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवारांनी कालही आम्ही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं म्हटलं.देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता लाभला आहे. त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी हा निर्णय घेतला असं अजित पवार म्हणाले. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.