• Tue. Mar 10th, 2026
    ‘अशाप्रकारे आवाजाची नक्कल पाहून बाळासाहेबांचा आत्मा काय…’ AI भाषणावरुन शिंदेसेनेचा ठाकरेंवर प्रहार

    Naresh Mhaske Reaction on Balasaheb AI Speech : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला. याच मेळाव्यात बाळासाहेबांचे AI भाषण दाखवण्यात आले. हे भाषण आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. यावर आता शिंदेसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला. याच मेळाव्यात बाळासाहेबांचे AI भाषण दाखवण्यात आले. हे भाषण आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. बाळासाहेबांच्या तंतोतंत आवाजातील हे भाषण होते. या भाषणातून भाजपवर फटकेबाजी करण्यात आली. बाळासाहेबांच्या या भाषणात शिवसेना भाजप युतीवर तसेच शिवसेना फुटीवर देखील भाष्य करण्यात आले आहे. भाजपला महाराष्ट्रात शिवसेनेने खांदा दिला. निष्ठावंत म्हणून घेणारेच गद्दार निघाले, असे उल्लेख या भाषणात आहे. या भाषणावर आता शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बाळासाहेबांचे खरे विचार आमच्यासोबत आहेत, असे म्हणत खासदार नरेश म्हस्केंनी पलटवार केला आहे.

    नरेश म्हस्के भाषणावर प्रतिक्रिया देत म्हणाले, ‘बाळासाहेबांच्या बनावट आवाजाचा उपयोग करावा लागला याचं वाईट वाटत आहे. पण बाळासाहेबांचे खरे विचार आमच्यासोबतच आहेत. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत. त्यांना बनावट कॅसेटचा उपयोग करावा लागला आहे. अशाप्रकारे बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल करून आमच्यावर टीका करतात. हे पाहून बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणत असेल?’
    Shiv Sena UBT : बाळासाहेब ठाकरे यांचं AI भाषण, आवाज अंगावर काटा आणणारा, भाजपवर घणाघात
    नरेश म्हस्केंनी पुढे हे भाषण म्हणजे ‘बाळासाहेबांचा अपमान’ म्हणत पलटवार केला आहे. ‘त्यांचा (उद्धव ठाकरेंचा) पक्ष शिल्लक राहिलेला नाही. त्यांना सर्वच सोडून चालले आहेत. म्हणून अशाप्रकारे बाळासाहेबांच्या आवाजात बोलायला लावून बनावटगिरी करत आहेत. हा बाळासाहेबांचा अपमान आहे,’ असे म्हस्के म्हणाले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed