मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, असा गौप्यस्फोट चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे चिखलीकर यांनी केला. भाजपात नव्याने आलेले काय टीका करतात याचा मला फरक पडत नाही असा टोला देखील प्रणिता चिखलीकर यांनी लगावला. विधानसभा निवडणुकीपूर्वी जी परिस्थिती निर्माण झाली होती, तिकीट वाटपा बाबतची त्यावरून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीच प्रताप पाटील चिखलीकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे सांगितले होते असे प्रणिता चिखलीकर म्हणाल्या. तर मलाही भाजपात राहण्याचे संकेत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिलेत असंही प्रणिता चिखलीकर यांनी सांगितले.