• Wed. Apr 23rd, 2025 11:57:26 AM

    खासदार कुलकर्णींनी कान टोचले; शहराध्यक्ष म्हणतात, मेधाताईंचं पत्र पेपरमधून समजणं योग्य नाही

    खासदार कुलकर्णींनी कान टोचले;  शहराध्यक्ष म्हणतात, मेधाताईंचं पत्र पेपरमधून समजणं योग्य नाही

    Deenanath Mangeshkar Hospital Death Case : “कुलकर्णींचं पत्र आजच माध्यमांच्या मार्फत मला कळालं, आज सकाळपर्यंत या पत्राची मला माहिती नव्हती. याप्रकरणी कोणतीही चर्चा खासदार मेधा कुलकर्णी आणि माझी झाली नाही.” असं धीरज घाटे म्हणाले.

    Lipi
    दीनानाथ हॉस्पिटल प्रकरणावर मेधा कुलकर्णी पत्र

    अभिजित दराडे, पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा सदस्यांनी केलेले वर्तन आणि कृती पक्षाला अशोभनीय असल्याचं सांगत भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी कान टोचले. त्यानंतर भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी उत्तर दिलं आहे. “कुलकर्णींचं पत्र आजच माध्यमांच्या मार्फत मला कळालं, आज सकाळपर्यंत या पत्राची मला माहिती नव्हती. याप्रकरणी कोणतीही चर्चा खासदार मेधा कुलकर्णी आणि माझी झाली नाही.” असं धीरज घाटे म्हणाले.

    धीरज घाटे काय म्हणाले?

    “ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी समाज मनावर याचे परिणाम झालेले दिसत होते, एका बाळंतीण महिलेच्या बाबतीत असं घडलं, त्याच्यावर महिला प्रतिनिधी म्हणून आमच्या हर्षदा फरांदे यांनी एखादं आंदोलन केलं किंवा प्रतिक्रिया दिली तर ते काही गैर नाही. लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवलाच पाहिजे. उद्या जर आंदोलन केलं नसतं, तरी तुम्ही लोकांनी प्रश्न उपस्थित केले असते. त्यामुळे या महिला कार्यकर्त्यांनी त्यांचं काम योग्य पद्धतीने केलं असं मला वाटतं.” असं धीरज घाटे म्हणाले.

    Sahyadri Election : भाजप आमदाराला सवतासुभा भोवला, ‘सह्याद्री’वर शरद पवारांच्या शिलेदाराची सत्ता, बाळासाहेब पाटलांचा विजयाचा गुलाल
    पक्षामध्ये पक्षाच्या बैठका असतात, पदाधिकारी नेते सगळे एकत्र बसत असतात, अशा बैठकांमधून ही चर्चा झाली पाहिजे, असं माझं मत आहे. माध्यमांच्या मार्फत असं काही समोर येतंय, थेट आम्हाला सकाळी वर्तमानपत्रात बातमी वाचायला मिळाली. सकाळी माध्यमांचे प्रतिनिधी प्रतिक्रिया घ्यायला आल्यावर मला हे सगळं कळालं, त्यामुळे हे योग्य नाही, मला असं वाटतं की पक्षाच्या चौकटीत राहून यावर चर्चा व्हायला हवी होती, अशी अपेक्षा धीरज घाटे यांनी व्यक्त केली.

    Karjat Nagar Panchayat : रोहित पवारांना धक्का, कर्जत नगरपंचायतीत एकहाती सत्तेला सुरुंग, १२ पैकी ८ नगरसेवकांची राम शिंदेंशी गुप्त भेट
    आमच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अगदी जवळ राहायला आहेत आणि त्यांच्या घराजवळ अशी घटना घडल्यानंतर त्या पदाधिकाऱ्याने घरात बसावं हे देखील योग्य नाही. त्यांचं आंदोलन म्हणजे महिलांच्या मनात आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे आणि ती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्या दिवशी त्यांनी जे आंदोलन केलं यात काहीच गैर नाही, असंही घाटे म्हणाले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed