शिर्डी येथे आयोजित क्रीडा शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात राम शिंदेंनी भाषण केलं.विनाअनुदानित शिक्षकांना अगदी थोडा पगार दिला जातो, मी देखील त्याचा लाभार्थी आहे असं राम शिंदे म्हणाले.ही सगळी परिस्थिती बघून मी चार वर्षात नोकरी सोडली, राजकारणात आलो असं मिश्किल वक्तव्य राम शिंदे यांनी केलंय.विना अनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांवर भाष्य करत शासनाने योग्य धोरण राबवले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केलीये.