Latur Crime News : लातूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वतःवर गोळी झाडून घेतली. सुदैवाने यात ते बचावले असन लातूरच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गोळीचा आवाज झाल्याने घरातील इतर सदस्यांनी त्यांच्या रूमकडे धाव घेतली. तात्काळ त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी आरपार गेली आहे. रात्रीतून काही शस्त्रक्रिया पार पडल्या असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचाराला ते प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिली आहे.Latur News : भर दुपारी कोयत्याने वार, विवाहितेसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाला संपवलं; लातूरमध्ये खळबळ
आत्महत्येचा प्रयत्न कशामुळे?
आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न का केला? याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. नेहमीप्रमाणे घरच्यांशी बोलत त्यांनी जेवण केलं. जेवण झाल्यावर ते स्वतःच्या रूमकडे गेले. काही वेळात गोळी झाडल्याचा आवाज आला. आत्महत्येचा प्रयत्न त्यांनी का केला? काही ताण तणाव होता का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.Latur News : वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी सुरू असताना शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
अनेक वरिष्ठ अधिकारी हॉस्पिटलमध्ये दाखल
आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना तात्काळ लातूरच्या सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे तसेच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाकडे आणि रुग्णालयाकडे धाव घेतली. महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी रुग्णालयामध्ये येत आयुक्तांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली होती. भाजप नेते डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, अनेक माजी नगरसेवक यांनी रुग्णालयात भेट देत आणि त्यांच्या प्रकृतीबाबत जाणून घेतलं.
Latur News : रात्री जेवून खोलीत गेले आणि अचानक भयंकर आवाज…महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
बाबासाहेब मनोहरे यांनी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड वागला मनपा आणि लातूर या ठिकाणी काम केलं आहे. नांदेड येथे अतिरिक्त मनपा आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर लातूर येथे आयुक्त म्हणून ते कार्यरत आहेत. अतिशय स्पष्टवक्ते असलेल्या आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्या सारखा विचार का करावा हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. लातूर पोलीस पुढील तपास करत आहेत.