माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. माझगाव कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आता निकाल जाहीर केला आहे. माझगाव कोर्टाने वांद्रे कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळत कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे हा निकाल करुणा शर्मा यांच्याच बाजूने लागल्याचं मानलं जात आहे.यावर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.