• Fri. Apr 11th, 2025 7:04:44 AM

    गगनयात्री मे महिन्यात अवकाशात झेपावणार? ‘अ‍ॅक्सिऑम ४’ मोहिमेतून शुभांशू शुक्ला घेणार भरारी

    गगनयात्री मे महिन्यात अवकाशात झेपावणार? ‘अ‍ॅक्सिऑम ४’ मोहिमेतून शुभांशू शुक्ला घेणार भरारी

    Shubhanshu Shukla Axiom-4 Mission: गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा समावेश असलेल्या ‘ॲक्सिऑम ४’ या मोहिमेचे मे महिन्यात प्रक्षेपण होऊ शकते.

    महाराष्ट्र टाइम्स
    shubhanshu shuklac

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : भारताच्या गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा समावेश असलेल्या ‘ॲक्सिऑम ४’ या मोहिमेचे मे महिन्यात प्रक्षेपण होऊ शकते. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणारे शुक्ला हे पहिले भारतीय नागरिक ठरतील. अमेरिकी अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने याबाबत नुकतीच माहिती दिली.

    गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शुक्ला आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर या गगनयात्रींची अवकाश मोहिमेसाठी अधिकृत निवड झाली होती. मोहिमेत शुक्ला यांच्याकडे कॅप्टनची जबाबदारी आहे. विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल चार दशकांनी भारतीय नागरिकत्व असणारी व्यक्ती अवकाश प्रवास करील. शुक्ला यांच्यासोबत अमेरिकेच्या पेगी व्हिट्सन या कमांडर असतील.
    चहाच्या आडून तिकीट घोटाळा; चहावाल्याकडून रेल्वे अधिकाऱ्यांच्या बनावट सही-शिक्क्यांचा वापर
    दोन वर्षांपूर्वी करार

    जून २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ आणि अमेरिकी अवकाश संशोधन संस्था- ‘नासा’च्या संयुक्त अवकाश मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. त्याला अनुसरून नासाशी व्यावसायिकरीत्या संलग्न असलेल्या ‘अॅक्सिओम स्पेस’ या कंपनीसोबत ‘इस्रो’च्या ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरने (एचएसएफसी) या मोहिमेसाठी अवकाश प्रवासाचा करार केला होता.
    सूनबाई जेवण मस्तय, पण झोप का येतेय! सासरचे डाराडूर; लग्नाच्या चारच दिवसात नाशिकची वधू दागिन्यांसह पसार
    अशी असेल मोहीम
    ■ ‘स्पेस एक्स’ कंपनीच्या ‘फाल्कन ९’ रॉकेटच्या साह्याने क्रू ड्रॅगन अवकाश यानामार्फत ही मोहीम पार पडेल.
    ■ ही मोहीम १४ दिवसांची असेल
    ■ मोहिमेत अंतराळवीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात विविध वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत.
    ■ तंत्रज्ञानांची तपासणी आणि अवकाश तंत्रज्ञानाचा सर्वसामान्यांमध्ये प्रसारही करतील.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed