• Fri. Apr 11th, 2025 12:43:30 PM
    १३ वर्षांच्या कॅन्सर पीडितेवर मदतनीसाकडूनच अत्याचार

    Assault On Cancer Patient : बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही कॅन्सरग्रस्त अल्पवयीन मुलगी राहते. अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीला दिवस गेले. कॅन्सर असल्यामुळे तिला केमो थेरपी घ्यायला लागत होती. केमो थेरपीला गेली असतानाच तपासणीदरम्यान मुलीच्या पोटात गर्भ वाढत असल्याचं डॉक्टरांना समजलं. आणि त्यांनी याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबाला दिली.

    Lipi

    प्रदिप भणगे, बदलापूर : बदलापूर पूर्वमध्ये पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली आहे. कॅन्सरग्रस्त(Cancer) असलेल्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. केमो थेरपी(Chemo Therapy) घेण्यासाठी ही अल्पवयीन मुलगी रुग्णालयात गेली असता ती गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ओळखीच्याच व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आहेत. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

    बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही कॅन्सरग्रस्त अल्पवयीन मुलगी राहते. अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीला दिवस गेले. कॅन्सर असल्यामुळे तिला केमो थेरपी घ्यायला लागत होती. केमो थेरपीला गेली असतानाच तपासणीदरम्यान मुलीच्या पोटात गर्भ वाढत असल्याचं डॉक्टरांना समजलं. आणि त्यांनी याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबाला दिली.

    कॅन्सरग्रस्त पीडित मुलगी बिहारची असून ती उपचारासाठी बदलापूर येथे आली होती. त्यानंतर त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने या मुलीची राहण्याची व्यवस्था केली. तसच तो व्यक्ती पीडित मुलीला उपचारासाठी मदत करत होता. त्याचदरम्यान या नराधमाने पीडितेवर अनेक वेळा अत्याचार केला. आणि ती अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. केमोचे उपचार सुरू असताना हा सगळा प्रकार समोर आला. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

    काही दिवसांपूर्वीच, पोलीस ठाण्यात पोलिसांच्याच खुर्चीत बसून रील बनवल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला डोंबिवलीतील प्रसिद्ध रिलस्टार सुरेंद्र पाटील याचा आणखी एक कारनामा उघडं झाला होता. पुण्यातील एका तरुणीला मुंबई एअरपोर्टमध्ये एअर होस्टेस म्हणून कामाला लावण्याचं आमिष दाखवून ऑफिसमध्ये बोलवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला. पुण्यातील पीडितेने मानपाडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सुरेंद्र पाटीलने तिला मुंबईतील विमानतळावर एअरहोस्टेसची नोकरी मिळवून देतो असं सांगितलं होतं. त्यासाठी त्याने तिला डोंबिवली येथील आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं. मग तो तरुणीला एका खोलीत घेऊन गेला आणि तिथे तिला बंदुकीचा धाक दाखवत अत्याचार केला. याची वाच्यता कुठे केली तर आई-वडिलांना मारण्याची धमकीही दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed