• Mon. Apr 14th, 2025 6:03:05 AM
    पालकमंत्री AIच्या यादीनुसार! चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट; भाजप अधिवेशनातील अफलातून किस्सा

    Chandrakant Patil: राज्यात सध्या कार्यरत असणारे पालकमंत्री कृत्रिम बुद्धीमत्तेला (एआय) विचारून ठरविण्यात आल्याचा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे: राज्यात सध्या कार्यरत असणारे पालकमंत्री कृत्रिम बुद्धीमत्तेला (एआय) विचारून ठरविण्यात आल्याचा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला. ही यादी तयार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारही उपस्थित असल्याचा खुलासा पाटील यांनी केला.

    चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात एआय तंत्रज्ञानावर आधारित ‘बिफोर चॅटजीपीटी टू एआय डिसरप्शन’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी एआय तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगताना पाटील यांनी शिर्डी येथील भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामधील एक अफलातून किस्सा सांगितला.
    Tanisha Bhise Death Case: भावाचे कॉल रेकॉर्ड, त्या दिवसाचे CCTV तपासा; भिसे कुटुंबाचे दीनानाथ रुग्णालयावर गंभीर आरोप
    मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा विषय हा काळजीपूर्वक हाताळण्याचा आहे. काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन झाले. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली ४० जणांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. एका ठिकाणी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्याबरोबर माझी चर्चा सुरू होती. तेव्हा त्यांनी एआयचा वापर आणि त्याची उपयुक्तता कशी आहे, हे आपल्याला थेट प्रात्यक्षिक करूनच दाखवले.

    ‘राज्यात विविध शहरातील पालकमंत्री नेमण्याची प्रक्रिया तेव्हा झाली नव्हती. त्यांनी एआयला पालकमंत्र्यांच्या नावांच्या यादीबाबच प्रॉम्प्ट देत, ती यादी त्यांनी एआयच्या माध्यमातून मला करून दाखवली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे आले आणि त्यांना ही यादी दाखवली, तेव्हा त्यांनी ही यादी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार करण्याची सूचना केली, त्यानुसार प्रॉम्प्ट दिला आणि यादी आली. राज्यात सध्या कार्यरत असणारे पालकमंत्री हे एआयचा वापर करून नेमण्यात आले,’ असा किस्सा पाटील यांनी एआयचे महत्त्व पटवून देण्यासाठी उपस्थिताना सांगितला.
    VIDEO कॉल करुन पत्नीचा गळफास, पतीनंही जीव दिला; लग्नानंतर ४० दिवसांनी जोडप्यानं जीवन संपवलं
    पालकमंत्रिपदावरुन महायुतीत बरीच धुसफूस पाहायला मिळाली. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही होती. पण रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आणि नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडे गेलं. राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंची रायगडच्या पालकमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गावर उतरत टायर जाळले आणि घोषणाबाजी केली होती.

    Harsh Dudhe

    लेखकाबद्दलHarsh Dudhe                                                                      … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed